आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेलंबाे- दिनेश कार्तिकच्या (२९) विजयी षटकाराच्या बळावर टीम इंडियाने रविवारी टी-२० ची तिरंगी मालिका जिंकली. राेहितच्या नेतृत्वाखाली भारताने फायनलमध्ये बांगलादेश टीमचा पराभव केला. भारताने ४ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने पहिल्यांदा टी-२० च्या फाॅरमॅटची मालिका अापल्या नावे केली.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद १६६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारताने ६ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. दिनेश कार्तिकसह कर्णधार राेहित शर्माचे (५६) माेलाचे याेगदान राहिले.
संकटात सापडलेल्या टीम इंडियाच्या विजयात दिनेश कार्तिकची खेळी उल्लेखनीय ठरली. त्याने तुफानी फटकेबाजी करताना विजयाचा पल्ला गाठून दिला. या वेळी त्याला विजय शंकरची साथ मिळाली.
बांगलादेश टीमकडून रुबेल हुसैनने दाेन गडी बाद केले. तसेच शाकिब अल हसन, नझमुल, मुस्तफिजूर रहमान अाणि साैम्य सरकारने प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, त्यांना टीम इंडियाला राेखता अाले नाही.
धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून सलामीवीर अाणि कर्णधार राेहित शर्माने दमदार सुरुवात केली. या वेळी त्याला शिखर धवनची साथ मिळाली. त्यांनी टीमला ३२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान माेठ्या खेळीच्या प्रयत्नात असलेल्या धवनला शाकीबने बाद केले. त्यामुळे अवघ्या १० धावांंचे याेगदान देऊन धवन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यापाठाेपाठ सुरेश रैना अाल्या पावली पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला. त्याला रुबेल हुसैनने झेलबाद केले. त्यामुळे रैना हा भाेपळाही न फाेडता बाद झाला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. युवा गाेलंदाज वाॅशिंग्टन सुंदर अाणि यजुवेंद्र चहलने अापल्या टीमचा कर्णधार राेहित शर्माने घेतलेल्या या निर्णयाला याेग्य ठरवले. वाॅशिंग्टनने संुदर गाेलंदाजी ३.२ षटकांत करताना भारतीय संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्याने सलामीवीर लिटाेन दासला सुरेश रैनाकरवी झेलबाद केले. लिटाेन दासने ११ धावांची खेळी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.