Home | Sports | Cricket | Cricket Celebrities | sania shoaib gave party to fakhar zaman at dubai house, shares photos

सानिया मिर्झा, शोएब मलिकने फखर झमानला दिली पार्टी, दुबईतून शेअर केला हा PHOTO

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 27, 2018, 12:23 AM IST

वनडे इंटरनॅशनल सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचे विक्रम केल्याबद्दल या कपलने त्याला शुभेच्छा दिल्या.

  • sania shoaib gave party to fakhar zaman at dubai house, shares photos

    दुबई - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या मॅटर्निटनी लीव्हवर आहे. ती आपला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकसोबत दुबईतील घरी आहे. याच घरात सानिया आणि शोएबने पाकचा तूफान फलंदाज फखर झमान याला पार्टी दिली. वनडे इंटरनॅशनल सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचे विक्रम केल्याबद्दल या कपलने त्याला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी क्रिकेटर खर झमान याने नुकतेच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या आपल्या 18 व्या वनडे सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात जलद 1000 धावा करून व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी हा पराक्रम 21 सामन्यांत केला होता. सोबतच, वनडे सामन्यात डबल सेंचुरी मारणारा फखर पाकिस्तानचा एकमेव खेळाडू बनला आहे.


    भारताच्या विरोधातही ठोकले शतक
    फखरने भारताच्या विरोधात चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलमध्ये शतक ठोकले होते. 106 बॉलमध्ये त्याने 3 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 114 धावा काढल्या होत्या. त्याच्या तूफान फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने भारताला 339 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यास प्रत्युत्तर देत उतरलेला भारतीय संघ 158 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने 180 धावांनी सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी काबीज केली होती. फखरने आतापर्यंत 18 अंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये 3 शतक आणि 6 अर्धशतक लगावले आहेत.

Trending