आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ravi Shastri On Team India Historical Victory, Says Get Latest Oxford Dictionary To Praise Virat Kohli

विराटच्या कौतुकासाठी ऑक्सफोर्डची नवी डिक्शनरी लागेल, रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या विजयावर कॅप्टन विराट कोहलीचे तोंडभर कौतुक केले. विराटचे कौतुक करताना आता ऑक्सफोर्डची नवीन डिक्शनरी लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. एवढेच नव्हे, तर विराट जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे असे शास्त्री म्हणाले आहेत. विराटने 6 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3 शतकांसह 558 धावा काढल्या. तो मालिकावीर ठरला आहे. त्याच्या धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला 5-1 ने पराभूत केले. 

 

थांबा, डिक्शनरी घेऊन येतो...
- मालिका विजयानंतर रवी शास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याला विराटच्या प्रदर्शनावर प्रश्न विचारण्यात आला. त्याला कोणते नाव देणार असे पत्रकारांनी विचारले. तेव्हा शास्त्री म्हणाले, "तुमच्या जागी मी असतो तर लगेच दुकानाता जाऊन ऑक्सफोर्डची नवीन डिक्शनरी घेऊन आलो असतो.''
- "हा मुद्दा केवळ विराटच्या सरासरी धावांचा नाही. तर एकूणच त्या धावांनी टीमवर पडलेला प्रभावाचा आहे. मी तर हेच म्हणणार की विराट जगातील सर्वात श्रेष्ठ फलंदाज आहे.''
- "मी तर म्हणतो, जो रूट, केन विल्यमसन, स्टीव्हन स्मिथसोबतच कोहलीला जगातील 4 टॉप फलंदाजांच्या यादीत समाविष्ट करायला हवे. टीममध्ये जे स्पिरिट दिसून आले. ती विराट कोहलीची देणगी आहे.''

बातम्या आणखी आहेत...