आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - श्रीलंकेत सुरू असलेल्या निदाहास टी-20 ट्राय सिरीझमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला पराभूत केले. यासोबतच टीमने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. याच सामन्याच्या वेळी घातलेल्या वादामुळे बांग्लादेशचा स्टार स्टार ऑलराउंडर आणि कॅप्टन शाकिब अल हसनवर मॅच फी चा 25 टक्के दंड लागला आहे. हा क्रिकेटर आपल्या देशात जितका प्रसिद्ध आहे, तेवढीच लोकप्रीय त्याची पत्नी उम्मी अहमद शिषीर देखील आहे. तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे ती नेहमीच चर्चेत राहते.
जेव्हा वाइफसाठी उद्योजकाशी भिडला
- शाकिब अल हसनने 2014 मध्ये भारत-बांग्लादेश सामन्याच्या वेळी एका उद्योजकाची धुलाई केली होती. त्याने कथितरीत्या शाकिबच्या पत्नीचा लैंगिक छळ केला होता.
- मीरपूर येथील नॅशनल क्रिकेट स्टेडिअम गॅलरीमध्ये 15 जून रोजी भारत विरुद्धच्या सामन्यात शाकिबची पत्नी उम्मी अहमद शिषीरचा लैंगिक छळ झाला होता.
- शाकिबला याचा पत्ता लागताच तो सिक्युरिटी स्टाफसह गॅलरीत पोहोचला तसेच त्याच्या बायकोला त्रास देणाऱ्या रहमान नावाच्या उद्योजकाची धुलाई सुरू केली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
शाकिबने केले लव्ह मॅरेज
- शाकिब अल हसन आणि उम्मी यांचा प्रेम विवाह झाला आहे. दोघांची लव्ह स्टोरी इंग्लंडमध्ये सुरू झाली होती.
- उम्मी अहमद बांग्लादेशी-अमेरिकन आहे. ती 10 वर्षांची असताना तिच्या पालकांनी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
- शाकिब आणि उम्मी यांची पहिली भेट इंग्लंडमध्ये झाली होती. शाकिब काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी तेथे होते, तर उम्मी सुट्टीवर होती.
- उम्मी आणि शाकिब एकाच हॉटेलात थांबले होते. त्याचवेळी त्यांची पहिली भेट झाली आणि लव्ह स्टोरी देखील सुरू झाली. 12 डिसेंबर 2012 रोजी त्यांचा विवाह झाला.
- परदेशात वाढलेली उम्मी बिनधास्त आयुष्य जगते. पार्टी आणि ग्लॅमरची शौकीन असलेली उम्मी आपल्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहते.
- अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून तिने एंजिनिअरिंग केली आहे. 4 भाऊ आणि 2 बहिणींमध्ये उम्मी सर्वात लहान आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघांचे आणखी काही फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.