आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T-20 मालिकेचा पहिला सामना; श्रीलंकेला सर्वाधिकवेळा पराभूत करणारा संघ ठरणार भारत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये भारतीय संघ निदाहास ट्रॉफी टी-20 तिहेरी मालिकेच्या पहिल्या सामन्यात आज श्रीलंका विरोधात उतरत आहे. भारताने हा सामना जिंकल्यास तो श्रीलंकेला सर्वाधिकवेळा पराभूत करणारा संघ ठरणार आहे. आतापर्यंत भारताने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला 10-10 वेळा पराभूत केले आहे. या मालिकेत तिसरा संघ बांग्लादेश आहे. 

 

दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती
- सीरीझसाठी कॅप्टन विराट कोहली आणि दिग्गज क्रिकेटर एमएस धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा टीमचा कॅप्टन आणि शिखर धवन उपकर्णधार आहे.
- धोनीच्या जागी विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत, ऑलराउंडर विजय शंकर आणि वॉशिंगटन सुंदर, बॅट्समन दीपक हुडा आणि फास्ट बॉलर मोहम्मद सिराजकडे स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. या व्यतिरिक्त वर्षभराच्या विश्रांतीनंतर सुरेश रैना कमबॅक करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...