आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कोसळून 21 वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू, प्रॅक्टिस दरम्यान घडली दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - कोलकाता क्रिकेट अकादमीत प्रॅक्टिस मॅच दरम्यान वीज कोसळून एका क्रिकेटरचा मृत्यू झाला. देवव्रत असे त्या क्रिकेटरचे नाव असून तो फक्त 21 वर्षांचा होता. मैदानावर रविवारी दुपारी ही घटना घडली, त्यावेळी इतर क्रिकेटर्स सुद्धा उपस्थित होते. देवव्रत एका महिन्यापूर्वीच क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला होता. 


> क्रिकेट क्लबचे सचिव अब्दुल मसूद यांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वच खेळाडू वॉर्मप मॅच संपल्यानंतर प्रॅक्टिससाठी मैदानात होते. परंतु, सराव सुरू होण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. देवव्रतवर वीज कोसळली होती. तो जागीच बेशुद्ध होऊन पडला. 
> मैदानावर उपस्थित असलेल्यांनी वेळीच त्याला उचलून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, तो शुद्धीवर आलाच नाही. ही घटना घडली त्यावेळी इतर खेळाडू सुद्धा मैदानावरच होते.
> मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेकानंद पार्कमध्ये दुपारी 1 वाजेच्या सुमारास खेळाडू सरावासाठी मैदानावर पोहोचले. त्याचवेळी देवव्रतच्या अंगावर वीज कोसळली. 
> सुरुवातीला त्याला शुद्धीवर आणण्यासाठी सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिससिएशन) करण्यात आले. सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्याला रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानमध्ये नेण्यात आले. त्याच ठिकाणी देवव्रतला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...