आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झाला पाकमध्ये पतीसाठी करावे लागतेय असे काही, दाखवली अशी इमेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतात सर्वत्र महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी सानिया मिर्झाची उदाहरणे दिली जातात. प्रत्येक महिलेसाठी ती एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. मात्र, पाकिस्तानात तिची वेगळीच इमेज दाखवली जात आहे. आपला पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत सानिया मिर्झा एका जाहिरातीमध्ये आली आहे. पाकिस्तानात प्रसारित केल्या जाणाऱ्या या जाहिरातीमध्ये तिचे महत्व पती शोएबच्या तुलनेत कमी दाखवण्यात आले आहे.

 

जगभरात ती महिलांसाठी प्रेरणास्रोत असली तरीही तिला या जाहिरातीमध्ये एक हाऊसवाइफ दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीतून पाकिस्तान महिलांविषयी असलेला दृष्टीकोन दिसून आला अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. 

 

काय आहे जाहिरातीमध्ये..?
- सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब एका टीव्हीवर जाहिरात येत आहे. आशिया घी यासाठी असलेल्या जाहिरातीत शोएबला लहानग्यांसोबत गल्ली क्रिकेट खेळताना दाखवण्यात आले. त्यांना तो जेवणासाठी घरी बोलावतो.
- यानंतर शोएब घरी जाऊन सानिया मिर्झाला स्वयंपाक करण्यासाठी सांगतो आणि घरी आलेली मुले एकत्रितरित्या जेवायला सुरुवात करतात. यानंतर सानिया सुद्धा त्यांच्यासोबत क्रिकेट खेळते.
- या संपूर्ण जाहिरातीमध्ये सानियाला दुय्यम दर्जा देण्यात आला. तर शोएबला एक स्टार क्रिकेटरच्या स्वरुपात दाखवण्यात आले आहे. तो सध्या पीएसएलचा स्टार क्रिकेटर आहे.
- 31 वर्षीय सानियाने वयाच्या 6 व्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. 17 व्या वर्षी ती प्रोफेशनल चॅम्पियन ठरली. पाकिस्तानात लग्न केले तरी आजही ते भारतासाठीच खेळते. 
- भारतासह समस्त कट्टर मुस्लिमांना न जुमानता तिने आपली बोल्ड आणि आत्मनिर्भर महिलेची इमेज तयार केली आहे. कित्येक मोठ-मोठ्या ब्रॅन्ड्सची ती एम्बॅसडर आहे. पण, या जाहिरातीत तसे मुळीच दिसत नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो आणि त्या जाहिरातीचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...