Home | Sports | Cricket | Cricket Celebrities | virat kohli shikhar dhawan show how to do bhangra at essex match in london

लंडनमध्ये विराट, शिखरचा भांगडा Viral; सोशल मीडियावर शिखर-पुजाराची जुगलबंदी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 28, 2018, 06:09 PM IST

एसेक्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • virat kohli shikhar dhawan show how to do bhangra at essex match in london

    स्पोर्ट्स डेस्क - भारताचा इंग्लडंच्या काउंटी टीम एसेक्स विरुद्ध झालेला सामना ड्रॉ झाला. या मॅचमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांवर तज्ञांनी सवाल उपस्थित केले. त्यापैकीच शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या वाइट फलंदाजीवर सर्वाधिक चर्चा झाली. धवन दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर बाद झाला. परंतु, याच मॅच दरम्यान तो कॅप्टन विराट कोहलीसह डान्स करताना दिसून आला. एसेक्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.


    कोहलीसह शिखरचा भांगडा
    व्हिडिओमध्ये फील्डिंगसाठी उतरणाऱ्या टीम इंडियाचे स्वागत ढोल-ताशाने करण्यात आले. त्याचवेळी विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानावर उतरत होती. सर्वप्रथम विराट आला आणि भांगडा केला. त्यावर रविंद्र जडेजाच्या मागे असलेला शिखर धवन वेळीच पुढे आला आणि त्याने देखील भांगडाच्या काही स्टेप्स केल्या. यानंतर चेतेश्वर पुजाराने सुद्धा त्यांचे अनुकरण केले. मॅचनंतर धवनने ट्विटरवर एक फोटो शेअर केला. त्यामध्ये तो कोहली आणि पुजारा यांच्या मधोमध फील्डिंग करताना दिसून आला. यानंतर धवन आणि पुजारा यांच्यात ट्विटरवर जुगलबंदी देखील रंगली.


    पुढील स्लाइडवर पाहा, विराट आणि शिखरच्या डान्सचा व्हिडिओ...

  • virat kohli shikhar dhawan show how to do bhangra at essex match in london

Trending