आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच संपल्यावर बॉलचे नेमके होते तरी काय? येथे जाणून घ्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेट मॅच संपल्यानंतर अनेक फॅन्सला प्रश्न पडत असेल की वापरलेल्या चेंडूचे नंतर काय केले जाते. बीसीसीआयने व्हिडिओ जारी करून त्याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सेंचुरिअन येथे झालेल्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. त्यामध्ये मॅच संपल्यावर बॉलचे काय झाले हे दाखवण्यात आले आहे.

 

नेमके काय केले..?  
- बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, त्या मॅचमध्ये वापरलेला चेंडू युजवेंद्र चहलला देण्यात आला. प्रत्यक्षात एखाद्या बॉलरने जबरदस्त परफॉर्म करून मॅच जिंकून दिल्यास त्या बॉलरला तो चेंडू दिला जातो. या मॅचनंतरही असेच झाले.
- या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बॉलवर सामन्याची माहिती लिहिताना दिसते. सुरुवातीला IND Vs SAF लिहिले, त्यानंतर ODI #2 आणि सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरिअन असे लिहिले.
- यासोबतच मॅचची तारीख आणि चहलने केलेली परफॉर्मंस लिहून तो चेंडू चहलला सोपविण्यात आला. यानंतर चहलने बॉलसोबत फोटो देखील काढला. 
- कुठल्याही मॅचमध्ये बॉलरला 'प्लेयर ऑफ द मॅच' घोषित केल्यास त्यालाच सामन्यात वापरलेला चेंडू अशा प्रकारे दिला जातो. 
- सेंचुरिअन येथील सामना भारताने 9 गडी राखून जिंकला. यात चहलने 8.2 षटकांत 22 धावा देत 5 गडी बाद केले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बीसीसीआयने जारी केलेला व्हिडिओ आणि काही फोटो...  

बातम्या आणखी आहेत...