Home | Sports | Cricket | Cricket Celebrities | Actress Nagma Finally Opens Up On Her Relationship With Sourav Ganguly

होय! सौरव गांगुलीसोबत अफेअर होते; 18 वर्षांनंतर नगमाचा खुलासा, यामुळे झाले Break-Up

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 08, 2018, 03:06 PM IST

18 वर्षांनंतर एका मुलाखतीमध्ये नगमाने त्यांच्या रिलेशनशिप आणि ब्रेक-अप संदर्भात खुलासा केला आहे.

 • Actress Nagma Finally Opens Up On Her Relationship With Sourav Ganguly

  स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली 8 जुलै रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. गांगुलीची पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही चर्चेत राहिल्या आहेत. त्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन 1996 मध्ये डोना हिच्याशी प्रेम विवाह केला होता. डोना सौरवच्या शेजारीच राहायची. 2000 मध्ये सौरव गांगुलीच्या लग्नात सुनामी आली जेव्हा गांगुली आणि त्यावेळी प्रसिद्ध राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमाच्या अफेअरच्या चर्चा उडाल्या. विवाहित असतानाही गांगुली नगमाला डेट करत आहे असे वृत्त समोर आले. आता त्या घटनेच्या तब्बल 18 वर्षांनंतर एका मुलाखतीमध्ये नगमाने त्यांच्या रिलेशनशिप आणि ब्रेक-अप संदर्भात खुलासा केला आहे.

  सौरवने घेतला होता ब्रेक-अपचा निर्णय...
  - 2000 मध्ये सौरव गांगुली आपल्या पूर्ण फॉर्ममध्ये होता. तसेच चांगल्या परफॉर्मन्समुळे त्याला टीमचा कर्णधार देखील करण्यात आले होते. याचवेळी बॉलिवूड अभिनेत्री नगमा चर्चेत होती.
  - सौरव गांगुली आणि नगमाच्या अफेअरच्या सर्वत्र चर्चा उडाल्या. परंतु, त्यावेळी सौरव किंवा नगमा यापैकी कुणीही समोर येऊन तथ्य मांडले नव्हते. आता 18 वर्षांनंतर नगमाने आपण सौरव गांगुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो अशी कबुली दिली आहे.
  - एका मुलाखतीमध्ये नगमा म्हणाली, 'आमच्या विषयी ज्या काही चर्चा होत्या, त्यास आमच्यापैकी कुणीही नकारलेले नाही. आमचे तोंड बंद होते. त्यामुळे, याचा गैरफायदा घेत ज्याच्या मनात जे आले त्यांनी त्या चर्चा सुरू केल्या होत्या.'
  - नगमा सांगते, '2000 मध्ये गांगुली करिअरच्या शिखरावर होता. त्यावेळी टीम इंडियाचे फॅन्स भारताचा पराभव आणि कॅप्टनच्या परफॉर्मन्समध्ये आलेला बिघाड सहन करण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्याचा परिणाम आमच्या रिलेशनशिपवर देखील झाला.'
  - 'इतर गोष्टींसह त्यावेळी करिअरची सुद्धा कसोटी लागली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गांगुलीने सुद्धा आपल्या करिअरवर फोकस करणे अधिक महत्वाचे मानले.'
  - 'येते इगो वाचवण्यासह अनेक गोष्टींचा भार होता. आणि तो भार एकालाच सहन करावा लागणार होता. नेहमीच मोठ्या नफ्यासाठी छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो.'


  आजही करतो एकमेकांचा आदर
  नगमाच्या मते, 'गांगुलीने घेतलेला निर्णय योग्य होता. परंतु, त्यावेळी फॅन्सच्या प्रतिक्रिया पाहून मी हैराण झाले होते. क्रिकेट फॅन्सला खेळाडूंच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये अंतर करता येत नाही. मैदानावर आपल्या आवडत्या क्रिकेटरचा फॉर्म बिघडल्यास ते एखाद्या व्यक्तीला दोष देतात. आमचे ब्रेक-अप आपसात चर्चेनंतर झाले परंतु, त्यासाठी फॅन्सच्या प्रतिक्रिया एक कारण आवश्य होते. क्रिकेट केवळ एक खेळ आहे हे फॅन्स कधीच समजून घेत नाहीत.' आपण आणि सौरव गांगुली दूर असलो तरीही आज सुद्धा एकमेकांच्या मनात तेवढाच आदेर आहे असे नगमाने स्पष्ट केले.

Trending