आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Awkward Reaction Of Ritika Wife Of Rohit Sharma After His Dismissal In IPL 2018 Match

IPL मध्ये रहाणेने केले असे काही, रोहितच्या पत्नीने दिली Awkward रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL-11 च्या 21 सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला गडींनी बाद केले आहे. सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच 7 गडी गमवून राजस्थानला 168 धावांचे आव्हान दिले. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खाते सुद्धा उघडू शकला नाही. रहाणेने त्याला शून्यावर धावबाद केले. त्यावरच रोहितची पत्नी रितिकाने ही रिअॅक्शन दिली. 


- मॅचमध्ये मुंबईचदी इनिंग सुरू असताना 16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलपर्यंत टीमचा स्कोर 135 होता. त्याचवेळी चौथी विकेट पडल्याने रोहित शर्मा फलंदाजीला उतरला. 
- बॅटिंगवर उतरताना त्याने एक बॉल मेडन खेळली. दुसऱ्या बॉलमध्ये त्याने एक कव्हर शॉट लावला आणि लगेच धावा काढण्यासाठी निघाला.
- रोहितच्या शॉटनंतर कव्हरमध्ये फील्डिंग करणाऱ्या अजिंक्य रहाणेने वेळीच बॉल अडवून डाइव्ह मारली आणि चेंडू नॉन स्ट्रायकर स्टंपवर फेकला. 
- रहाणेचा थ्रो अचूक लागला आणि तोपर्यंत रोहित क्रीझमध्ये पोहोचला नव्हता. अशात रोहित शर्माला एक धाव सुद्धा काढता आला नाही. निर्णय थर्ड अंपायरकडे गेला, त्यांनीही रोहितला बाद ठरवले. त्यावरच रितिका शॉक झाली होती. 


मॅच समरीः
मुंबई इंडियन्स- 167/7 (20 ओव्हर) (सूर्यकुमार- 72, इशान- 58)
राजस्थान रॉयल्स- 168/7 (19.4 ओव्हर) (सॅमसन- 52, स्टोक्स- 40, गौतम- 33*)


पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या सीनचे काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...