बॉल टेम्परिंग: भारताने / बॉल टेम्परिंग: भारताने केली होती पहिली तक्रार; सर्वाधिक 5 वेळा अडकला पाकिस्तान

बॉल टेम्परिंग: भारताने केली होती पहिली तक्रार; सर्वाधिक 5 वेळा अडकला पाकिस्तान.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2018 10:53:00 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या केपटाउन येथील टेस्ट सामन्यात बॉल टेम्परिंगची जगभरात चर्चा आहे. या आरोपानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि व्हाइस कॅप्टन डेव्हिड वॉर्नर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉलसोबत छेडछाड करण्याचे हे पहिले प्रकरण नाही. सर्वात पहिले प्रकरण 1977 मध्ये समोर आले होते. बॉल टेम्परिंगची ही पहिली तक्रार भारताने केली होती. तो आरोप इंग्लंडच्या संघावर होता. या आरोपात सर्वात जास्त वेळा अडकलेला संघ पाकिस्तानचा आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 वर्षांत बॉल टेम्परिंगच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यात पहिला आरोपइंग्लंड विरोधात 1977 मध्ये लागला. तर ऑस्ट्रेलियाचा संघ या प्रकरणी कारवाईला सामोरे जाणारा 12 वा संघ ठरला आहे. आम्ही आपल्याला त्या सर्व 12 प्रकरणांची माहिती देत आहोत.


1) इंग्लंड, 1977
भारतविरोधात चेन्नईत टेस्ट सामना सुरू होता. त्यावेळी कॅप्टन बिशन सिंग बेदी यांनी इंग्लंडचा राइट आर्म बॉलर जॉन लेव्हर याच्यावर व्हॅसेलीनने बॉल चमकवण्याचे आरोप लावले होते. पण, त्याचे पुरावे सापडले नव्हते.

2) पाकिस्तान, 1992
- वकार युनूस आणि वसीम अकरम यांच्यावर इंग्लंड विरोधात टेस्ट सामन्यामध्ये कोल्ड ड्रिंकच्या झाकणाने बॉल घासल्याचे आरोप लागले होते. पण, तो आरोपही सिद्ध झाला नाही.

3) इंग्लंड, 1994
कॅप्टन मायकल अथर्टनला साउथ आफ्रीका विरोधात बॉल टेम्परिंग करताना पकडले गेले होते. यानंतर अथर्टनवर जवळपास 2 लाखांचा दंड लागला होता.

3) पाकिस्तान, 2000
वकार युनूस बॉल टेम्परिंग प्रकरणी निर्बंध लादण्यात आलेला पहिला बॉलर होता. दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या त्या एकदिवसीय सामन्यात कॅप्टन मोइन खान आणि ऑलराउंडर अजहर महमूदच्या फी मधून 30 टक्के रक्कम कापण्यात आली होती.

4) भारत, 2001
दक्षिण आफ्रिका विरोधात सचिन तेंडुलकरवर बॉल टेम्परिंगचे आरोप लागले होते. त्याला एका सामन्यासाठी बॅन करण्यात आले होते. पण, आरोप सिद्ध नाही झाल्याने त्याच्या विरोधातील बॅन हटवण्यात आला.

5) पाकिस्तान, 2002
झिम्बाब्वे विरोधात झालेल्या टेस्ट सामन्यात शोएब अख्तरने बॉल दातांनी चावून खराब केल्याचे आरोप लागले होते.

6) भारत, 2004
झिम्बाब्वे विरोधात झालेल्या सामन्यात राहुल द्रविडने बॉलवर जेली लावल्याचे आरोप लागले होते. मॅच रेफरी क्लीव्ह लॉएड यांनी त्याच्यावर दंड लावला होता.

7) पाकिस्तान, 2006
इंग्लंड विरोधात टेस्ट खेळताना पाकिस्तानी खेळाडूंनी बॉल खराब केल्याचे आरोप लागले होते. यानंतर कर्णधार इंजमाम उल-हक टी ब्रेकनंतर टीमला मैदानावर घेऊन आलाच नाही. त्यावेळी इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते.

8) पाकिस्तान, 2010
ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या एका मॅचमध्ये शाहिद आफ्रीदीने बॉल मुद्दाम घासल्याचे आरोप लागले. यासाठी आफ्रीदीवर दोन टी-20 सामन्यांपुरता प्रतिबंध लागला होता.

9) दक्षिण आफ्रीका, 2013
पाकिस्तान विरोधात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस बॉल आपल्या पॅन्टवर घासताना सापडला होता. त्यासाठी त्याच्या मॅचची 50 टक्के फी कापण्यात आली होती. सोबतच, पाकिस्तानला अतिरिक्त 5 धावा देण्यात आल्या होत्या.

10) दक्षिण आफ्रीका, 2016
श्रीलंका विरोधात झालेल्या मॅचमध्ये गोलंदाज वर्नन फिलेंडरवर अशाच प्रकारचे आरोप लागले. त्यानंतर त्याच्या फी मधून 75 टक्के रक्कम कापण्यात आली होती.

11) दक्षिण आफ्रीका, 2016
ऑस्ट्रेलिया विरोधाच्या सामन्या फाफ डु प्लेसिसवर होबार्ट टेस्टमध्ये बॉल टेम्परिंगचे आरोप लागले. पण, हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही.

12) ऑस्ट्रेलिया, 2018
दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या केपटाउन येथील टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन कॅमरन बेनक्रॉफ्टवर हे आरोप लागले. यानंतर कर्णधार आणि उप-कर्णधाराने राजीनामा दिला. कारवाईची प्रक्रिया अजुनही सुरू आहे.

सर्वाधिक 5 वेळा टेम्परिंगमध्ये अडकला पाकिस्तान...शोएब अख्तर

सर्वाधिक 5 वेळा टेम्परिंगमध्ये अडकला पाकिस्तान...

शोएब अख्तर
X
COMMENT