आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मॅचनंतर दिसली राहुल-पंड्याची केमिस्ट्री, मैदानावर एक्सचेंज केली एकमेकांची जर्सी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 50 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबला अवघ्या 3 धावांनी पराभूत केले. करा किंवा मराच्या या मॅचमध्ये सुरुवातीला टॉस हारलेला मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबई इंडियन्स पूर्ण ओव्हर खेळत गडी गमावून 186 धावा काढल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेला पंजाबचा संघ फक्त 183 धावाच काढू शकला. KXIP चा पराभव झाला तरीही त्यांच्या संघातील फलंदाज लोकेश राहुलने सर्वांची मने जिंकली. त्याने 60 बॉलमध्ये 94 धावा काढल्या आहेत. यानंतर हार्दिक पंड्यासोबत असे काही केले की सगळेच पाहून थक्क झाले. 

 

पंड्यासोबत केली जर्सी एक्सचेंज...
- मॅचमध्ये KXIP पराभूत झाला तरीही त्यांचा बॅट्समन केएल राहुलच्या स्पोर्ट्समनशिपने सर्वांची मने जिंकली आहेत. मॅचनंतर त्याने राहुल आणि MI चा सदस्य हार्दिक पंड्याने बाउंड्रीजवळ उभे राहून एकमेकांची जर्सी एक्सचेंज केली. 
- हार्दिक पंड्याने मुंबईच्या जागी पंजाबचा टीशर्ट घातला. तर लोकेशने मुंबईची टीशर्ट घातली. लोकेश राहुलला हार्दिकने टीशर्ट घालण्यात मदत केली. तसेच हार्दिक सुद्धा आपल्या मित्राला मदत करताना दिसून आला. या दोघांची मैत्री आणि केमिस्ट्री पाहून सगळेच हैराण झाले. 

 
हे होते कारण...
- जर्सी बदलण्याचे कारण सांगताना राहुल म्हणाला, 'फुटबॉलच्या मैदानात असे नेहमीच घडत असते. हार्दिक आणि मी खूप चांगले मित्र आहोत. मला जर्सी कलेक्ट करणे आवडते. त्यामुळे, मला वाटले की क्रिकेटमध्ये सुद्धा असाच ट्रेंड यायला हवा.'
- राहुल पुढे म्हणाला, 'असे काही करण्यासाठी आम्ही काहीच ठरवलेले नव्हते. मॅचनंतर बातचीत करताना त्याने माझी जर्सी मागितली. हा खूप खूप मजेशीर राहिला.'


मॅच समरी
मुंबई इंडियन्स- 186/8 (20 ओव्हर) (कीरोण- 50, कृणाल- 32, टाय- 4/16)
किंग्स XI पंजाब- 183/5 (20 ओव्हर) (राहुल- 94, फिन्च- 46, बुमराह- 3/15)
MoM- जसप्रीत बुमराह


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...