आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता श्रीलंकेच्या कर्णधारावर बॉल टॅम्परिंगचे आरोप, स्वीटनर लावून चमकवला चेंडू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांडीमलने खिशात स्वीटनर ठेवून त्याने बॉल टॅम्परिंग केल्याचे आरोप लागले आहेत. ही घटना श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंजीजच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये तिसऱ्या दिवशी घडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन महिन्यात बॉल टॅम्परिंगची ही दुसरी घटना आहे. याच वर्षी मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून बेनक्रॉफ्टने दक्षिण आफ्रिका विरोधात टेस्ट दरम्यान बॉल टॅम्पर केले होते. यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांनीही टॅम्परिंगची कबुली दिली. 


श्रीलंकन कर्णधाराला असे पकडले...
श्रीलंका-वेस्टइंडीज टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंका विकेट्सच्या शोधात होता. त्याचवेळी ऑन फील्ड अंपायर अलीम डार, इयान गुल्ड आणि टीव्ही अंपायर रिचर्ड कॅटलबोरो यांनी श्रीलंकेच्या कर्णधारावर संशय व्यक्त केला. त्याच्या बॉलला चकाकी देण्याचा अंदाज या पंचांना खटकला. ब्रॉडकास्टर्सकडून फुटेज मागवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी पंचांनी फुटेज पाहिली. त्यानुसार, श्रीलंकन कर्णधार डाव्या खिशातून स्वीटनर काढतो, आपल्या तोंडात ठेवतो आणि यानंतर चेंडूला घासतो असे दिसून आले. यानंतर कर्णधार तोच चेंडू बॉलर लहीरू कुमारा याला देतानाही दिसून आला. 


वेस्ट इंडीजला मिळाल्या 5 धावा
फुटेज पाहिल्यानंतर पंचांनी सांगितले, की चांडीमलने बॉलची स्थिती बदलण्यासाठी असे केले आहे. त्याने असे करून आयसीसीचे कोड ऑफ कंडक्ट मोडले आहेत. त्या विरोधात कारवाई म्हणून, अंपायर अलीम डार आणि इयान गुल्ड यांनी चेंडू बदलला. तसेच वेस्ट इंडीजच्या संघाला अतिरिक्त 5 धावा दिल्या. या पेनल्टीवर श्रीलंकन खेळाडू नाराज दिसले. त्यांनी मैदानावर न उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, व्यवस्थापनाशी चर्चा झाल्यानंतर 2 तास उशीराने ते मैदानावर आले. 


बॅन, फीस कापण्याचीही शक्यता
कारवाई येथेच संपलेली नाही. या प्रकरणाची सुनावणी रेफरी जवागल श्रीनाथ करणार आहे. दोषी सापडल्यास चांडीमलवर बंदी लागू शकते. किंवा त्याच्या विरोधात दंड म्हणून 50 ते 100 टक्के फी कपात सुद्धा केली जाऊ शकते. आयसीसीच्या समितीने तर त्याच्या विरोधात 8 वनडे मॅचची बंदी लावण्याची मागणी केली होती. त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...