आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - IPL सीझन 11 च्या 14 व्या सामन्यात मुंबई आणि बेंगलुरू एकमेकांविरोधात उतरले होते. मुंबई इंडियन्सने रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलुरूला 46 धावांनी पराभूत केले. यात दोन्ही संघांच्या कर्णधारांनी जबरदस्त बॅटिंग केली. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने 52 बॉलमध्ये 94 धावा काढल्या. त्यामध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. तर विराटने सुद्धा नाबाद 92 धावांची खेळी केली. या सामन्यात असाही एक प्रसंग आला जे पाहून चिअरलीडर्स हैराण झाल्या.
हे होते कारण...
- मॅचमध्ये हा मोमेंट मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगच्या वेळी पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्चर झाला. मुंबई टीमकडून सूर्य कुमार यादव ओपनिंग करण्यासाठी उतरला होता. तसेच तो उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. तेव्हा टीमने खाते देखील उघडले नव्हते.
- मॅचच्या पहिल्या बॉलवर पहिली विकेट पडल्याचे पाहून चिअरलीडर्स हैराण झाल्या. त्यांनी शॉकिंग एक्सप्रेशन दिले तेच कॅमेऱ्यात टिपले आहेत.
- पहिली विकटे पडली. मुंबईची टीम सावरलीच होती, की दुसऱ्या बॉलवर आणखी एक बॅट्समन बाद झाला. मुंबईचा संघ डगमगल्याचे पाहता, कॅप्टन रोहित शर्मा आणि इव्हिन लुईस यांनी मॅच सांभाळली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी काही फोटो...
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.