आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंचुरी लावल्या चेन्नई, पंजाबच्या खेळाडूंनी; तरीही विराटचा संघ होतोय Troll

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सला 64 धावांनी पराभूत केले. मॅचच्या विजयात बॅट्समन शेन वॉटसन हिरो ठरला. त्याने 57 बॉलमध्ये 106 काढल्या. यात 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वॉटसनने चेन्नईकडून राजस्थान विरोधात शतक ठोकले. तरीही चाहत्यांनी विराटचा संघ आरसीबीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचे कारण म्हणजे, आयपीएलमध्ये ख्रिस गेल आणि वॉटसन यांनी सेंचुरी लावली. हे दोन्ही बॅट्समन यापूर्वी आरसीबीकडून खेळत होते. पण, या सीझनमध्ये आरसीबीने त्या दोघांना रीटेन केले नाही. 

 

मॅच समरीः
चेन्नई सुपर किंग्सः 204/5 (20 ओव्हर) (वॉटसन- 106, रैना- 46)
राजस्थान रॉयल्सः 140 (18.3 ओव्हर) (बेन स्टोक्स-45)


पुढील स्लाइड्सवर वाचास विराट पुन्हा झाला ट्रोल, आल्या अशा कॉमेंट...

बातम्या आणखी आहेत...