आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये पुन्हा फ्लॉप ठरला युवराज; फॅन्स म्हणाले, संन्यास घेण्याची वेळ आली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 च्या 22 व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला 4 धावांनी पराभूत केले. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात विनर शेवटच्या बॉलवर ठरला. दिल्लीत झालेल्या मॅचमध्ये पंजाबने प्रथम फलंदाजी करत 143 धावा काढल्या. टीमकडून सर्वाधिक 34 धावा अरुण नायरच्या होत्या. तर, युवराज सिंह पुन्हा फ्लॉप ठरला. त्याने फक्त 14 धावा काढल्या. टूर्नामेंटच्या 5 सामन्यात त्याने एकूण फक्त 50 धावा काढल्या आहेत. पंजाबने मॅच जिंकली तरीही फेल गेलेल्या युवराजवर फॅन्सने संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर युवराजला रिटायर होण्याचे सल्ले देण्यात आले. 

 

मॅच समरीः
किंग्स XI पंजाब- 143/8 (20 ओव्हर) (नायर- 34, मिलर- 26)
दिल्ली डेअरडेव्हिल्स- 139/8 (20 ओव्हर) (अय्यर- 57, तेवटिया- 24)

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराजवर संतापलेल्या चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...