आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उप-अधीक्षक बनली क्रिकेटर हरमनप्रीत कौर, CM ने लावले स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - क्रिकेटर हरमनप्रीत कौरने पंजाब पोलिसांत डीएसपी पदाचा कारभार सांभाळला आहे. क्रिकेटमध्ये उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल पंजाब सरकारने तिला पोलिस उप-अधीक्षक पदी नियुक्ती केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानी सीएम आणि डीजीपी सुरेश अरोरा यांनी हरमनच्या खांद्यावर स्टार लावले. या निमित्त क्रिकेटर हरमनचे वडील आणि समस्त परिवार उपस्थित होता. तिची ड्युटी जालंधर येथे लावण्यात आली आहे. 

 

6 वर्षांपूर्वी झाली होती रिजेक्ट
- हरमनप्रीतने 2011 मध्ये पोलिसांत नोकरीसाठी अर्ज दिला होता. पण, तिला रिजेक्ट करण्यात आले होते. कथितरीत्या महिला क्रिकेटर्ससाठी पोलिसांत नोकरीची व्यवस्था नाही असे तिला सांगण्यात आले होते. 
- हरमनचे वडील हरमनंदर सिंग भुल्लर यांनी सांगितल्याप्रमाणे, 'त्यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला म्हटले होते. हरमन काही हरभजन सिंग नाही, की तिला आम्ही डीएसपीच्या पदावर नियुक्त करू.'
- त्यावेळी तिला पोलिस इंस्सपेक्टरची पोस्ट सुद्धा देण्यात आली नव्हती. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग पंजाब पोलिसांत डीएसपी पदावर कार्यरत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, हरमनबद्दल आणखी काही माहिती...

बातम्या आणखी आहेत...