आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमीचा मोबाईल सापडला नसता तर त्याने मलाच तलाक देऊन सोडले असते -हसीन जहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - क्रिकेटर मोहम्मद शमीवर आरोप लावून देशभर चर्चेत आलेली त्याची पत्नी हसीन जहाने आता नवा आरोप लावला आहे. तिने रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यानुसार, पती शमीच्या बीएमडब्लू कारमध्ये त्याचा मोबाईल आपल्या हाती लागला नसता तर शमीनेच आपल्याला तलाक देऊन सोडले असते. मोबाईल हाती लागल्यानंतरच त्याचे सत्य समोर आले. तेव्हापासूनच शमीचे वर्तन बदलले. हसीन जहाने शमी विरोधात अनेक महिलांसोबत अफेअर ठेवण्याचे आरोप लावले आहेत. तसेच त्याच्या विरोधात कोलकात्यात एफआयआर दाखल करून मारहाण, बलात्कार, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि हुंडाबळी अशी तक्रार दाखल केली. यात तिने एकूणच 4 जणांना आरोपी केले आहे.


आता काय म्हणाली हसीनजहा?
- हसीन पुढे म्हणाली, "आता हे प्रकरण खूप पुढे गेले आहे. अशात दोघांमध्ये चर्चेतून तडजोड करण्याची शक्यता उरलेली नाही."
- "नाते वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला. तो परत येण्यासाठी तयार असला तरी आजही मी त्यावर विचार करू शकते."
- "पण, तो स्वतःला वाचवण्याचाच प्रयत्न करत आहे. त्याच्या विरोधातील पुरावे मी माध्यमांसमोर देखील मांडले आहेत. तरीही मीडिया त्याची चौकशी का करत नाही. सोशल मीडियावर देखील सर्व पुरावे आहेत."
- हसीन जहाने आपल्या पतीसह सासू, नणद आणि जाऊ या चौघांच्या विरोधात कोलकात्यात एफआयआर दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...