आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • DD Vs KXIP Live Score, IPL 2018: Match Between Delhi Daredevils And KingsXIPunjab In Mohali On 8th April

लाेकेशच्या वेगवान अर्धशतकाने पंजाब विजयी; दिल्लीचा पराभव;18.5 षटकांत केली मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेहाली- नवा कर्णधार अार. अश्विनच्या नेतृत्वाखाली  किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. लाेकेश राहुल (५१) अाणि करुण नायरच्या (५०) झंझावाती फलंदाजीच्या बळावर पंजाबने अापल्या पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मात केली. पंजाबने १८.५ षटकांत ६ गड्यांनी धडाकेबाज विजयाची नाेंद केली. यासह पंजाबने घरच्या मैदानावरील उल्लेखनीय कामगिरीने यंदाच्या लीगमध्ये विजयाने माेहिमेला दमदार सुुरुवात केली.   


गाैतम गंभीरच्या अर्धशतकाच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात यजमान पंजाबच्या टीमने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात सामनावीर लाेकेश राहुल अाणि करुण नायरचे माेलाचे याेगदान ठरले. त्यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबकडून सलामीवीर लाेकेश राहुलने दमदार सुरुवात केली. या वेळी त्याला मयंंक अग्रवालची माेलाची साथ मिळाली. त्यामुळे त्यांनी टीमच्या विजयाचा मजबुत पाया रचला. 

 

मयंंक-लाेकेशची अर्धशतकी भागीदारी 
पंजाबला लाेकेश राहुल अाणि मयंकने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी घरच्या मैदानावर दिल्लीची गाेलंदाजी फाेडून काढताना संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यांनी ५८ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, ७ धावांचे याेगदान देऊन मयंक पॅव्हेलियनमध्ये परतला.

 

लाेकेशचा झंझावात 
पंजाबच्या लाेकेश राहुलने  रविवारी अायपीएलमध्ये वेगवान अर्धशतकाची नाेंद केली. त्याने १४ चेंडूंत ५० धावा काढल्या. यात ६ चाैकार अाणि चार षटकारांचा समावेश अाहे. यासह त्याने २०१४ मधील युसूफ पठाण, सुनील नरेनला (२०१७) मागे टाकले. यांच्या नावे १५ चेंडूंत अर्धशतकाची नाेंद अाहे.

 

आयपीएल खेळणारा सर्वात युवा क्रिकेटर मुजीब
अफगाणिस्तानचा 17 वर्षीय मुजीब जादरान आयपीएल खेळणारा सर्वात युवा क्रिकेटर आहे. त्याने सरफराज खानचा विक्रम मोडला आहे.

 

खेळाडू वय टीम
मुजीब रहमान 17 वर्षे 11 दिवस पंजाब
सरफराज खान 17 वर्षे 177 दिवस आरसीबी
प्रदीप सांगवान 17 वर्षे 179 दिवस दिल्ली

 

असे आहेत संघ...

दिल्ली इलेव्हन : गौतम गंभीर (कॅप्टन), कॉलिन मनरो, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, विजय शंकर, डेनिअर ख्रिश्चियन, राहुल तेवतिया, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी

 

पंजाब इलेव्हन : लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, करुण नायर, मार्कस स्टोइनिस, युवराज सिंह, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन (कॅप्टन), अँड्रयू टाये, मोहित शर्मा, मुजीब रहमान

 

आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 भारतीय कर्णधार
- रविचंद्रन अश्विन पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून मैदानावर उतरला आहे. अश्विन या लीगचा 44 वा कॅप्टन आहे. 2008 पासून आतापर्यंत 43 कॅप्टन बनले आहेत. यात 24 कॅप्टन परदेशी आणि 19 कॅप्टन भारतीय आहेत. अश्विन 20 वा भारतीय कर्णधार ठरला आहे. 
- गौतम गंभीर 2010 च्या सीझननंतर पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळत आहे. 2011 मध्ये केकेआरने त्याला खरेदी केले होते. यानंतर 2018 च्या लिलावात रिलीझ करण्यात आले होते. 
- तसेच गौतम गंभीर सुद्धा 8 आयपीएल सीझननंतर दिल्लीची कॅप्टनशिप करत आहे. गंभीरने यापूर्वी 2011 पासून 2017 पर्यंत कोलकाता नाइटरायडर्स( केकेआर) चे कर्णधार पद भूषविले आहे. त्याने आपल्या नेतृत्वात केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...