आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन करून दाखवण्याच्या जिद्दीत माजी खेळाडूने जिंकला ऑस्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस - अमेरिकेचा माजी बास्केटबॉल प्लेअर कोबे ब्रायंटने आपल्या क्रीडा पुरस्कारांच्या यादीत एक वेगळे पुरस्कार जोडले आहे. तो आता ऑस्कर विजेता बनला आहे. 5 वेळा NBA (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) चॅम्पियन ठरलेला कोबे ब्रायंटचे 5 मिनिटांचे चलचित्रपट 'डिअर बास्केटबॉल' बेस्ट शॉर्ट अॅनिमेटेड फिल्म म्हणून निवडले गेले आहे. हा लघुपट 2015 मध्ये त्यानेच लिहिलेल्या पत्रावर आधारित आहे. 

 

- कोबे ब्रायंटने आपल्या शॉर्ट मूव्हीमध्ये बास्केटबॉल विषयी असलेली जिद्द, संघर्ष आणि प्रेम दाखवले आहे. लघुपटात अमेरिकन अॅनिमेटर ग्लेन कीनने दिग्दर्शन केले आहे. 39 वर्षीय कोबे याने 2016 मध्ये बास्केटबॉलमधून संन्यास घेतला होता. 
- त्याने आपल्या 20 वर्षांच्या स्पोर्ट्स करिअरमध्ये फक्त एक क्लब लॉस एंजेलिस लेकर्सकडून खेळले आहे. त्याने रिटायरमेंट घेतली तेव्हा त्याच्या दोन्ही जर्सी 8 आणि 24 नंबर सुद्धा रिटायर करण्यात आले. 
- अवॉर्ड जिंकल्यानंतर कोबे म्हणाला, ' एक बास्केटबॉल खेळाडू असताना आम्ही शांत राहतो. फक्त खेळण्याकडेच लक्ष देतो. पण, मला याचा खूप आनंद वाटतो की रिटायरमेंटनंतर मी काही नवीन करत आहे. या सन्मानसाठी सर्वांना धन्यवाद. मला इतका मोठा आनंद तेव्हा झाला होता जेव्हा मी NBA चॅम्पियनशिप जिंकली होती.'

 

पुढील स्लाइड्सवरव पाहा, कोबेच्या शॉर्ट फिल्मचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...