आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमीच्या समर्थनात उतरला धोनी; म्हणाला, तो दगा देऊ शकत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या समर्थनात भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी उतरला आहे. मोहम्मद शमी दगा देऊच शकत नाही असा दावा धोनीने केला आहे. शमी आपल्या खासगी आयुष्यात मोठ्या वादळाचा सामना करत आहे. त्याची पत्नी हसीन जहाने त्याच्यासह कुटुंबातील 4 जणांविरोधात हुंडाबळी, मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला. तसेच शमीचे अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचे कथित पुरावे देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. 

 

आणखी काय म्हणाला धोनी?
- धोनी म्हणाला, 'जितके मी शमीला ओळखतो तो एक खूप चांगला माणूस आहे. तो आपल्या पत्नीला दगा देऊ शकत नाही. तरीही ही त्याची खासगी समस्या आहे. यावर मी जास्त काही बोलणार नाही.' 
- शमीची पत्नी हसीन जहा गेल्या आठवडाभरापासून माध्यमांसमोर येऊन नव-नवीन आरोप करत आहे. त्यातच तिने मंगळवारी आणखी एक दावा केला. पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिकेतील महिलांसोबतही शमीचे अवैध संबंध आहेत असे ती म्हणाली. 
- तत्पूर्वी सोमवारी बोलताना, शमीचा मोबाईल हाती लागला नसता तर शमीनेच आपल्याला घटस्फोट देऊन सोडून दिले असते असा दावा तिने केला होता. 
- मोहम्मद शमीने 2013 मध्ये टेस्ट डेब्यू केले होते. त्यावेळी भारताचा कर्णधार एमएस धोनी होता. यानंतर शमीने 2014 मध्ये टी-20 डेब्यू केले. 

 

बातम्या आणखी आहेत...