आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी झाली क्रिकेट जगतातील पहिली बॉल टॅम्परिंग, 'व्हॅसेलीन'ने पलटली मॅच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - बॉल टॅम्परिंगचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघ्या तीन महिन्यांत बॉलशी छेडछाड केल्याचे दुसरे प्रकरण समोर आले आहे. तीन महिन्यांपूर्वी बॉल टॅम्परिंगसाठी ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंवर जगभरातून टीका झाली. आता हेच आरोप श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांडीमलवर लागले आहेत. त्याने स्वीटनर लावून बॉल टॅम्परिंग केली असे म्हटले जात आहे. बॉल टॅम्परिंग करताना याहून वाइट आणि विचित्र पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. त्वचेवर लावल्या जाणाऱ्या व्हॅसेलीनने क्रिकेट मॅच सुद्धा पलटला जाऊ शकतो. अनेकांना हे ऐकूण धक्का बसेल की क्रिकेटच्या इतिहासातील पहिली चीटिंग आणि बॉल टेम्परिंग ही व्हॅसेलीनने झाली होती. 1977 मध्ये तो सामना भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये रंगला होता. त्याचवेळी इंग्लंडने भारताला पराभूत करण्यासाठी हा रडीचा डाव खेळला होता.


नेमके काय घडले?
- 1977 मध्ये इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर होता. सलग दोन टेस्ट सामने जिंकल्यानंतर इंग्लंड भारताला तिसऱ्यांदा पछाडण्यासाठी चेन्नईच्या मैदानावर होता. या सामन्यात इंग्लंडचा मीडियम पेस बॉलर जॉन लेव्हरचा चेंडू जादुई पद्धतीने स्विंग करत होता. पिच तशी नसतानाही बॉल इतका मस्त स्विंग होतोच कसा असा प्रश्न सर्वांना पडला होता.
- सीरीझच्या पहिल्या सामन्यापासूनच त्याची बॉलिंग चर्चेत होती. दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि त्याच्या डेब्यू सामन्यात लेव्हरने 46 धावा देत 7 विकेट घेतल्या. तसेच दुसऱ्या इनिंगमध्ये 24 धावांवर 3 बळी घेतले. अशी धक्कादायक बॉलिंग पाहून भारतीय टीमचे कर्मधार बिशन सिंग बेदी यांनी शंशय व्यक्त केला. 
- एकटा जॉन लेव्हर साऱ्या भारतीय संघावर भारी कसा पडू शकतो असा प्रश्न त्यांना पडला होता. यानंतर त्यांनी बारकाईने लेव्हरच्या बॉलिंगचे निरीक्षण केले. तो बॉलिंग करताना वारंवार आपल्या डोक्यावरील घाम पुसून चेंडूला घासत असल्याचे बेदी यांच्या लक्षात आले. प्रत्यक्षात तो घाम नसून व्हॅसेलीन असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


अंपायरनेही पकडले
इंग्लंडच्या 262 धावा झाल्यानंतर भारताची इनिंग 164 वर संपली होती. येथे जॉन लेव्हरने 59 धावांवर 5 गडी बाद केले. यावरून अंपायरने देखील संशय घेतला. अंपायरला लेव्हरच्या हाताच्या स्ट्रिपवर व्हॅसेलीन लावलेले दिसून आले. अंपायरने वेळीच याची माहिती कॅप्टन बेदी यांना दिली. तसेच बेदींनी पत्रकार परिषदेत इंग्लंडचा भांडाफोड केला. इंग्लंड टीमच्या फिजिओथेरेपिस्टने सुद्धा व्हॅसेलीन लावण्याचे आरोप स्वीकारले. बॉल टेम्परिंगचे आरोप लागताच पहिल्या टेस्ट सामन्यात चमकलेला लेव्हर फॅन्सच्या नजरेत व्हिलेन बनला.


पुढील स्लाइड्सवर वाचा, मग काय घडले आणि काय आहेत टेम्परिंगवर आयसीसीचे नियम...

बातम्या आणखी आहेत...