आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल संघ दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा झटका बसला आहे. त्यांचा कर्णधार गौतम गंभीरने अचानक आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्याची जागा आता 23 वर्षीय श्रेयस अय्यरला दिली जाणार आहे. आयपीएलमध्ये टीमच्या वाइट प्रदर्शनाची जबाबदारी घेत त्याने हा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, आयपीएल 2018 च्या संघनिहाय क्रमवारीत दिल्लीचा संघ सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
काय म्हणाला गंभीर?
- गौतम गंभीरने आयपीएलच्या सुरुवातीचे तीन सीझन दिल्ली टीमचा सदस्य म्हणून खेळले होते. 2011 मध्ये त्याने कोलकाता नाइटरायडर्सचे कर्णधार पद भूषविले. पुढील 7 वर्षे तो कोलकाताकडूनच खेळला. त्याच्याच नेतृत्वात कोलकाता नाइटरायडर्सने दोनदा आयपीएल जिंकली.
- गंभीरने याच वर्षी दिल्लीच्या संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली. व्यवस्थापनाने त्याला दिल्लीचे कर्णधार पद दिले होते.
- गंभीर म्हणाला, "हा माझाच निर्णय आहे. मी टीमला पुरेसे योगदान देऊ शकलो नाही. एका जहाजाचा कॅप्टन म्हणून जबाबदारी घ्यावीच लागते. मला वाटते, हीच ती वेळ आहे.'
- श्रेयस अय्यर म्हणाला, "कॅप्टनची जबाबदारी सोपविल्याबद्दल मी व्यवस्थापनाचे आभार मानतो. टीम कोच आणि व्यवस्थापनाने मला यासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद, ही मोठ्या सन्मानाची बाब आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.