आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Actress ने केएल राहुलला विचारले, डेटवर येशील का? वाचा त्यांची संपूर्ण Chatting

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आपल्या धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखल्या जाणारा भारतीय क्रिकेटर केएल राहुल सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. एका पंजाबी अॅक्ट्रेससोबत त्याने केलेली चॅटिंग व्हायरल होत आहे. नुकतेच राहुलचे नाव बॉलिवूड अॅक्ट्रेस निधी अग्रवालशी जोडले जात होते. त्याने अफेअर असल्याच्या वृत्तास नकार दिला. त्यातच आता या पंजाबी अॅक्ट्रेसने त्याला डेटवर येशील का अशी विचारणा केली. त्यावर राहुलने रिप्लाय देखील केला आहे. 


अशी झाली Chatting...
सोनम बाजवा या पंजाबी अॅक्ट्रेसने नुकताच आपला एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये आपण सूर्यास्त पाहताना तुझाच विचार करत आहे असे लिहिले. त्याखाली केएल राहुलने कॉमेंट केली. फक्त एक कॉल दूर आहे सोनम बाजवा. यानंतर सोनमने सुद्धा त्यावर लगेच रिप्लाय केला. यात तिने हार्ट शेपचे इमोजी पाठवले आणि आज रात्री डेटवर येशील का अशी विचारणा राहुलला केली. राहुलने त्यास पुन्हा उत्तर दिले. परंतु, हे उत्तर शब्दात नव्हे, तर इमोजीमध्ये होते. इमोजी टाकून त्याने आपण विचार करतोय आणि कंफ्यूज आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. राहुलला त्याखाली सोनमने पुन्हा रिप्लाय केले. आणि फनी इमोजी पाठवले. या दोघांचे चॅटिंग प्रचंड व्हायरल होत आहे. 


अनेक तरुणींशी जोडले गेले राहुलचे नाव...
- केएल राहुल आयपीएल 2018 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळत होता. आपल्या जबरदस्त फलंदाजीने त्याने भरपूर लोकप्रियता मिळवली. तो सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. 
- केएल राहुलचे नाव यापूर्वी अनेक तरुणींशी जोडले गेले. अनेकवेळा त्यांचे राहुलसोबत असलेले फोटो सोशल मीडियावर पसरवण्यात आले. त्यापैकीच एक नाव निधी अग्रवालचे होते. आता राहुलचे नाव सोनमसोबत जोडले जात आहे. सोनम बाजवाचा चित्रपट 'कॅरी ऑन जट्टा-2' नुकताच रिलीझ झाला असून तो सुपरहिट ठरला आहे. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, या दोघांचे चॅटिंग...

बातम्या आणखी आहेत...