आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीरासोबत शरीर संबंधांसाठी मजबूर करायचा शमी, हसीन जहाचे नवे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर मोहम्मद शमीवर विविध प्रकारचे गंभीर आरोप लावल्यानंतर आता त्याची पत्नी हसीन जहाने धक्कादायक आरोप केला. हसीन जहाने सांगितल्याप्रमाणे, शमी आपल्या लहान भावासोबत अर्थात दीरासोबत शारीरिक संबंधंसाठी मजबूर करत होता. हसीन जहाने हे आरोप एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये लावले आहेत. शमीने वेळोवेळी तिला दीरासोबत संबंध बनवण्यासाठी विवश करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच, मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांचा तिने पुनरुच्चार केला आहे.

 

हुंडाबळीचा FIR दाखल
पत्नीने मारहाण आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावल्यानंतर क्रिकेटर मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. त्याच्या विरोधात पत्नी हसीन जहाने शुक्रवारी कोलकात्यातील बाजार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. यात तिने शमीसह 4 जणांना आरोपी केले. तसेच या चौघांवर हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, हत्येचा प्रयत्न, धमकी आणि कटकारस्थान असे आरोप लावण्यात आले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...