आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमी हसीन जहाचा दुसरा पती, पहिला पती सैफुद्दीन चालवतो किराणा दुकान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर मोहम्मद शमी आपल्या पत्नीने लावलेल्या आरोपांमुळे अडचणीत असताना आता त्याच्या पत्नीबद्दलच नवा खुलासा झाला. शमी हसीन जहाचा पहिला पती नाही. शमीसोबत हसीन जहाने केलेले हे दुसरे लग्न होते. हसीन जहाला आपल्या पहिल्या पतीकडून दोन मुली देखील आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, हसीन जहा हिने क्रिकेटर मोहम्मद शमी विरोधात हिंसाचार, रेप आणि मारहाणीसह जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे आरोप लावले. तसेच कोलकाता येथील पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. तेव्हापासूनच हसीन जहा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय आहे. 

 

- मोहम्मद शमी आणि हसीन जहा यांचा विवाह 2014 मध्ये झाला होता. हसीन जहा आणि शमीची पहिली भेट झाली तेव्हा हसीनचा पहिला विवाह मोडलेला होता. तिला पहिल्या पतीकडून दोन मुली आहेत. 
- हसीन आणि शमी यांच्या वयातही मोठी तफावत आहे. हसीन जहाचे वय 41 वर्षे आहे. तर शमी फक्त 28 वर्षांचा आहे. 
- हसीन जहाचा पहिला विवाह शेख सैफुद्दीन आहे. सैफुद्दीन आणि हसीन जहा यांना दोन मुली झाल्या. मात्र, त्यांचे लग्न जास्त दिवस टिकले नाही. 2010 मध्ये त्यांचा तलाक झाला. 
- एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हसीन जहाने सांगितले, पहिला विवाह मोडल्यानंतर आता शमीसोबत चांगले आयुष्य जगू अशी तिची इच्छा होती. 

 

2002 मध्ये झाला पहिला प्रेम विवाह
- हसीन जहा आणि सैफुद्दीन यांचा विवाह 2002 मध्ये झाला होता. त्यांच्यात प्रेम विवाह झाला होता. हसीन जहा 10 वी ला असताना सैफुद्दीनने तिला प्रपोझ केला होता. 
- एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफुद्दीनने सांगितले, मला माहिती नाही, की हसीन जहाने मला का सोडले. ती एक अतिशय महत्वाकांक्षी महिला होती. 
- सैफुद्दीन बीरभूम जिल्ह्यातील सूरी बाजारात बाबू स्टोर नावाचे छोटेशे किराण दुकान चालवतो. त्याची पहिली मुलगी 14 वर्षांची आहे. तर दुसरी मुलगी सहावीला शिकते. 
- सैफुद्दीनने सांगितल्याप्रमाणे, तलाक झाले तेव्हापासून हसीन जहा आणि त्याचा संपर्क झाला नाही. पण, माझ्यासोबत राहणाऱ्या दोन्ही मुली नेहमीच आपल्या आईशी बोलत असतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...