आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट बोर्ड सदस्य जितके विराटला पूजतात तितके मोदींना कॅबिनेटही करत नसेल -रामचंद्र गुहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) चे अधिकारी आणि भारतीय संघाच्या कर्णधारावर हल्लाबोल केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, बोर्डाचे अधिकारी विराटला देव मानून पूजतात. तेही इतके की केंद्रातील कॅबिनेट सुद्धा पीएम मोदींना करत नसेल. बीसीसीआय एक विराटच्या अहंकारासमोर आत्मसमर्पण केलेली संस्था अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र त्यांनी एका लेखाच्या माध्यमातून सोडले आहेत. क्रिकेटच्या कामकाजाची देखरेख करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्थापित केलेल्या प्रशासकीय समितीचे ते सदस्य देखील होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये सुपरस्टार कल्चरचे कारण देत 4 महिन्यात पद सोडले होते. 

 

बोर्डाचे अधिकारी प्रत्येक बाबीत घेतात विराटचा सल्ला
- गुहा यांनी आपल्याच समितीचे प्रमुख विनोद राय यांच्यासह सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणचे सदस्यत्व असलेल्या समितीला देखील सोडले नाही.
- त्यांनी लिहिले, "अनिल कुंबळेला हटवून रवी शास्त्रीसारख्या सामान्य क्रिकेटरला केवळ यासाठी हेड कोच बनवण्यात आले, कारण विराट कोहली त्यांच्यापुढे नतमस्क झाला होता."
- "ज्या बाबतीत कर्णधाराचा काहीच हस्तक्षेप नसतो, तेथे सुद्धा विराटने डोके घातले होते.''
- "बोर्डाचे अधिकारी ज्या बाबतीत कर्णधाराची काहीच भूमिका नाही, त्यात सुद्धा विराटचा सल्ला घेतात. भावी क्रिकेट टूर असो वा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी सर्वच निर्णयांमध्ये विराट आपले नाक खुपसतो.''
- "परिस्थिती अशी झाली की बोर्डाच्या सीईओनेच म्हटले, की प्रत्येक मुद्यावर विराटचा निर्णय अंतिम राहील.''

 

पुढे वाचा, विराट आणि कुंबळेंबद्दल आणखी काय म्हणाले रामचंद्र गुहा...

बातम्या आणखी आहेत...