आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या लज्जास्पद कृत्याची सर्वत्र चर्चा आहे. भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने त्याच्याशीच संबंधित एक ट्वीट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, बॉल टेम्परिंग केल्यानंतर अंपायर्सच्या नजरेतून बेनक्रॉफ्ट वाचला होता. पण, ज्याने बेनक्रॉफ्टला पकडले त्याचाच फोटो सेहवागने शेअर केला.
काय म्हणाला सेहवाग..?
सेहवागने फील्ड कॅमेरामन ऑस्कर याचा एक फोटो शेअर करताना त्याची माहिती दिली. सेहवागने लिहिले, 'लक्ष देऊन पाहा या व्यक्तीला. ऑस्कर- द कॅमरामन. यांच्या नजरेतून सुटणे अशक्यच.' हा फोटो त्या कॅमेरामनचा आहे, ज्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर कॅमरन बेनक्रॉफ्टला बॉल टेम्परिंग करताना पकडले होते.
अंपायर्सने पकडले तेव्हा...
फील्डवर अचानक बेनक्रॉफ्टने बॉल हातात ठेवून सर्व टीम मेंबर्सला एका ठिकाणी बोलावले. घेराव टाकून बॉल दिसू नये अशी व्यवस्था करताना चर्चेचे सोंग केले. यानंतर आपल्या अंडरवेअरमधून काही तरी काढताना तो अंपायर्सला दिसून आला. यावर वेळीच अंपायर्सने त्याला बोलावून चौकशी केली. तेव्हा बेनक्रॉफ्टने आपल्या पॅन्टमधून एक बॉक्स उघडले आणि आपला गॉगल दाखवला. बॉल टेम्परिंगचा प्रकार टिपला तो ऑस्करने. त्याच्याच शूटिंगने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सच्या रडीचा डाव समोर आला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अंपायर्सने पकडले तेव्हा आणि चीटिंगचा फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.