आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीने आधी दिला तिरंग्याला सन्मान, आता विराटबद्दल म्हटले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारताचा कर्णधार विराट कोहली एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोन्ही देशांमध्ये राजकीय संबंध खराब असले तरीही त्याचा आपल्या मैत्रीवर काहीच परिणाम होत नाही असे आफ्रिदीने म्हटले आहे. आफ्रिदीने हे मनोगत स्वित्झरलंडमध्ये व्यक्त केले आहे. याच ठिकाणी तो आइस क्रिकेट टूर्नामेंट खेळणार आहे. स्वित्झरलंडमध्येच आफ्रिदीने भारतीय चाहत्यांसोबत फोटो काढताना भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याला सन्मान दिला होता. याबद्दल त्याचे भारतात सुद्धा कौतुक झाले. 

 

आणखी काय म्हणाला आफ्रिदी
- पाकिस्तासाठी 398 वनडे सामने खेळलेल्या स्फोटक फलंदाजाने सांगितले, 'विराट आणि माझ्या मैत्रीवर भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय संबंधांचा काहीच परिणाम होत नाही. विराट एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे. माझ्यासारखाच तो देखील आपल्या देशातील क्रिकेटचा दूत आहे.'
- 'विराटने मला नेहमीच खूप आदर-सन्मान दिला आहे. त्याने आपण स्वाक्षरी केलेली त्याची एक टीशर्ट सुद्धा माझ्या सेवाभावी संस्थेला गिफ्ट दिली होती.'
- तो पुढे म्हणाला, 'मी जेव्हा विराटबद्दल बोलतो, तेव्हा मनात खरोखर आपुलकी आणि बंधूभावाची भावना येते. आम्हाला निवांत बोलण्याची संधी तर कधी मिळत नाही. पण, आम्ही मेसेजेसमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहतो. नुकतेच मला त्याच्या लग्नाची बातमी मिळाली. मी वेळीच त्याला बोललो आणि शुभेच्छा दिल्या.'
- दोन देशांमध्ये राजकीय मतभेद असतानाही नागरिक आणि खेळाडू कसे एकमेकांचे मित्र राहू शकतात याचे उदाहरण म्हणून आमच्या दोघांचे नाव घेता येईल. 
- एवढेच नव्हे, तर पाकिस्ताननंतर आपल्याला सर्वात जास्त प्रेम आणि आपुलकी भारतात मिळाली असेही माजी पाकिस्तानी क्रिकेटरने स्पष्ट केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या दोघांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...