आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोहान्सबर्ग - भारतीय क्रिकेट टीमला शनिवारी वनडे मालिकेच्या चौथ्या सामन्यात मालिका विजयाची संधी आहे. हा सामना जिंकल्यास भारत इतिहास घडवणार आहे. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत 6 मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी एकही जिंकता आलेली नाही. 1992 मध्ये 7 सामन्यांची सिरीझ पहिल्यांदा खेळण्यात आली होती. सध्याच्या 6 सामन्यांच्या मालिकेत भारत 3-0 अशा आघाडीवर आहे. हा सामना संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होणार आहे.
कुलदीप आणि चहलने घेतले 21 विकेट्स
चालू वनडे मालिकेत स्पिनर्स टीम इंडियाची ताकद ठरले आहेत. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी एकूणच तीन सामन्यांमध्ये 21 विकेट घेतल्या आहेत. पण, सुरुवातीच्या तीन सामन्यांत दुखापतीमुळे बाहेर असलेला एबी डिव्हिलिअर्स परतला आहे. तो स्पिनर्सला चांगल्या प्रकारे खेळतो. त्याच्या गैरहजेरीत चहल आणि कुलदीप हे स्पिनर्स चमकले. आता तो पुढील 3 सामन्यांसाठी परतला आहे.
1st ODI | 2nd ODI | 3rd ODI | एकूण | |
कुलदीप यादव (विकेट/रन) | 3/34 | 3/20 | 4/23 | 10 |
युजवेंद्र चहल (विकेट/रन) | 2/45 | 5/22 | 4/46 | 11 |
विराटने लावले 2 शतक
विराट कोहलीने जबरदस्त परफॉर्म करताना तीन सामन्यात 318 धावा काढल्या आहेत. त्याने केपटाउन येथे झालेल्या सामन्यात नाबाद 160 धावा, सेन्चुरियनमध्ये नाबाद 46 धावा आणि डरबनमध्ये 112 धावा काढल्या आहेत. केपटाउनमध्ये त्याने 100 धावा धावूनच काढल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेत भारताचे परफॉर्मंस
वर्ष | मॅच | निकाल |
1992 | 7 | दक्षिण आफ्रिकेचा 5-2 ने विजय |
1997 | 5 | दक्षिण आफ्रिकेचा 4-0 ने विजय |
2001 | 4 | दक्षिण आफ्रिकेचा 3-1 ने विजय |
2006 | 4 | दक्षिण आफ्रिकेचा 4-0 ने विजय |
2011 | 5 | दक्षिण आफ्रिकेचा 2-3 ने विजय |
2013 | 3 | दक्षिण आफ्रिकेचा 2-0 ने विजय |
असे आहेत दोन्ही संघ...
टीम इंडिया
विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर
टीम दक्षिण आफ्रिका
एडिन मार्क्रम (कॅप्टन), हाशिम आमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी डुमिनी, फरहान बेहारदीन, इमरान ताहिर, एच क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मोर्न मोर्कल, क्रिस मॉरिस, लुंगी एनगिडी, आंदिले फेहुलकवायो, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायो जोंडो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.