आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs SA दुसरा टी-20 आज; कॅप्टन विराट मोडू शकतो सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचा पहिला सामना बुधवारी संध्याकाळी खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या सिरीझला रविवारपासून सुरुवाकत झाली आहे. भारताने पहिल्या सामन्यात 28 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता बुधवारचा सामना जिंकल्यास भारताला अख्खी मालिका काबिज करण्याची संधी आहे. त्यातच 21 आणि 24 फेब्रुवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यांत कॅप्टन विराट कोहलीकडे सर डॉन ब्रॅडमन यांच्यापुढे निघण्याची संधी आहे. तो विवियन रिचर्ड्स यांची बरोबरी करू शकतो. हे दोन्ही सामने संध्याकाळी 9.30 वाजता खेळले जाणार आहेत. 

 

विराटने 10 सामन्यात बनवल्या 870 धावा
जबरदस्त फॉर्मात असलेल्या विराटने आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांत 13 वेळा बॅटिंग केली. त्यामध्ये त्याचा सरासरी रनरेट 87 आणि 82.38 चा स्ट्राइक रेट आहे. त्याने एकूणच 870 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये 4 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 

 

डॉन ब्रॅडमन यांना पिछाडीवर टाकू शकतो विराट
- आतापर्यंत एका परदेश दौऱ्यात सर्वाधिक (1045) धावा काढण्याचा विक्रम विवियन रिचर्ड्स यांच्या नावे आहे. तत्पूर्वी ब्रॅडमन यांनी 1930 मध्ये इंग्लंड विरोधात पाच टेस्ट सामन्यांत 974 धावा काढल्या होत्या.
- विराटने दोन टी-20 सामन्यात 105 धावा काढल्यास तो ब्रॅडमन यांची बरोबरी करू शकतो. तर रिचर्ड्स यांच्या पुढे जाण्यासाठी त्याला आणखी 175 धावा काढाव्या लागणार आहेत. 
- विवियन रिचर्ड्स यांनी 1976 मध्ये इंग्लंड विरोधात झालेल्या परदेश दौऱ्यात टेस्ट आणि वनडे मालिकेत 1045 धावा काढल्या होत्या. त्यांनी 4 टेस्टच्या 7 इनिंग्समध्ये 829 धावा 3 वनडे मॅचमध्ये 216 धावा काढल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...