आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरमधील 100 व्या वनडेत शानदार शतक;शिखर धवन ठरला पहिला भारतीय शतकवीर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेहान्सबर्ग- टीम इंडियाच्या सलामीवीर शिखर धवनला करिअरमधील १०० वा वनडे अविस्मरणीय कामगिरीने गाजवता अाला. त्याने दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सामन्यात शनिवारी झंझावाती नाबाद शतक झळकावले.  करिअरमधील १०० व्या वनडे सामन्यात शतक साजरे करणारा शिखर धवन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला.  या वेळी त्याला कर्णधार विराट काेहलीची माेलाची साथ मिळाली.  या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचली.  भारताने प्रथम फलंदाजी करताना चाैथ्या वनडेत ७ बाद २८९ धावा काढल्या. यात काेहलीने (७५) तुफानी अर्धशतकाचे याेगदान दिले.  राेहित शर्मा ५ धावांची खेळी करून परतला.    


धवन जगातील नववा फलंदाज : अापल्या करिअरमधील १०० व्या वनडे सामन्यात शतक साजरे करणारा शिखर धवन हा जगातील नववा फलंदाज ठरला. तसेच भारताचा पहिला फलंदाज म्हणून त्याने हा मान पटकावला.    


अाठ वर्षांत शतकाचा पल्ला : शिखर धवनने अाठ वर्षांच्या करिअरमध्ये शतकी वनडेचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्याने  २०१० मध्ये  वनडेत पदार्पण केले हाेते. त्याने विशाखापट्टणम येथे अाॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला हाेता.

 

धवनचा झंझावात 
टीम इंडियाच्या सलामीवीर शिखर धवनने मालिका विजयासाठी चाैथ्या वनडेत तुफानी खेळी केली. या झंझावातादरम्यान त्याने अाफ्रिकेच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने १०२ चेंडूंचा सामना करताना १० चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे नाबाद १०७ धावांची खेळी केली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, १०० व्या वनडेतील शतके आणि फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...