आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs SA पहिला टी-20 आज: विराटला फॉरमॅटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - एकदिवसीय मालिकेकत ऐतिहासिक विजयानंतर भारत दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी रविवारी मैदानावर येत आहे. 3 सामन्यांच्या 20-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने 3-0 मालिका जिंकल्यास भारत दक्षिण आफ्रिकेला त्यांच्यात मातृभूमीवर सर्वाधिक वेळा 20-20 मध्ये पराभूत करणारा संघ ठरणार आहे. यासोबतच, विराटने फक्त 44 धावा काढल्यास त्याच्या टी-20 फॉरमॅटमध्ये 2000 धावा पूर्ण होतील. असे करणारा तो पहिला भारतीय ठरेल.

 

भारताने दक्षिण आफ्रिकेत खेळले 4 टी-20
- भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याच विरोधात 4 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यांत भारताचा विजय झाला. तर एका सामन्यात पराभव झाला. 
- आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरात टी-20 मध्ये सर्वात जास्त वेळा (5) पराभूत करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाकडे आहे.

 

विराट करू शकतो आणखी एक विक्रम
- विराट कोहलीकडे आपल्या टी-20 करिअरच्या 2000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त 44 धावा काढण्याची गरज आहे. आतापर्यंत कुठल्याही भारतीय फलंदाजाने हा आकडा पूर्ण केला नाही. 
- विराटच्या या फॉरमॅटमध्ये सरासरी 52.86 धावा आहेत. 500 हून अधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये 50 हून अधिक एव्हरेज स्कोर ठेवणारा विराट एकटाच आहे. 

 

भारताला वरचढ ठरू शकतो दक्षिण आफ्रिका
- टी-20 फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिका भारताला जड जाऊ शकते. एबी डि व्हिलियर्स, डेव्हिड मिलर आणि क्रिस मॉरिस टी-20 चे उत्कृष्ठ खेळाडू आहेत. 
- वनडे सामन्यांमध्ये हे तिन्ही खेळाडू यशस्वी ठरले नसले तरीही चौथ्या वनडे सामन्यात त्यांची खेळी सर्वांना दिसून आली. भारताला टी-20 मध्ये या तिघांना थांबवणे अवघड ठरू शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...