आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या माेहिमेला सुरुंग; अाठ वर्षांनंतर श्रीलंका विजयी; श्रीलंकेची 1-0 ने अाघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला- कसाेटी मालिका पराभवातून सावरलेल्या श्रीलंका टीमने रविवारी यजमान टीम इंडियाला सलामीच्या वनडे सामन्यात धूळ चारली. श्रीलंकेने ७ गड्यांनी माेठ्या विजयाची नाेंद केली. सुरंगा लकमलच्या (४/१३) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ थरंगा (४९), मॅथ्यूज (नाबाद २५) अाणि डिकवेला (नाबाद २६) यांच्या झंझावाताच्या बळावर श्रीलंकेने २०.४ षटकांत सामना जिंकला. यासह श्रीलंकेने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी माेहालीच्या मैदानावर हाेणार अाहे. भारताकडून माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने (६५) दिलेली अर्धशतकाची एकाकी झंुज अपयशी ठरली.  


भारताला प्रथम फलंदाजी करताना ३८.२ षटकांत ११२ धावा काढता अाल्या. त्यानंतर श्रीलंकेने ३ गड्यांच्या माेबदल्यात २०.४ षटकांत विजयाचे लक्ष गाठले. श्रीलंकेकडून थरंगाने ४९ धावांचे याेगदान दिले. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र,  थरंगाने  डाव सावरला. त्याने शानदार ४९ धावांची खेळी केली. अवघ्या एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. त्यानंतर मॅथ्यूज अाणि डिकवेलाने अभेद्य ४९ धावांची भागीदरारी करून श्रीलंकेचा विजय निश्चित केला. डिकवेलाने २४ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकारांच्या अाधारे नाबाद २६ धावांची खेळी केली. 

 

> ०४ विकेट श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने घेतल्या. यामुळे ताे सामनावीरचा मानकरी ठरला. 

> ०४ भारतीय   फलंदाज शून्यावर बाद

> ६५ धावांची धाेनीची सर्वाेत्तम खेळी


भारताची विजयी माेहीम राेखली

सामनावीर सुरंगा लकमलने सलामीच्या सामन्यात धारदार गाेलंदाजी करताना यजमान भारताचा खुर्दा उडवला. यातून भारताची सत्रातील विजयाची माेहीम खंडित झाली. नुकतीच सलग विजयाच्या बळावर भारताने सत्रात नऊ मालिका जिंकण्याच्या जागतिक विक्रमाची बराेबरी साधली. लकमलने कसाेटीतही चांगली गाेलंदाजी केली.

 

२००९ नंतर श्रीलंका विजयी 
पाहुण्या श्रीलंका टीमला गत अाठ वर्षांपासूनची  भारतीय मैदानावरील पराभवाची मालिका खंडित करण्यात अखेर यश मिळाले. श्रीलंकेने २००९ मध्ये अापला शेवटचा सामना भारतात जिंकला हाेता. त्यानंतर एकाही सामन्यात श्रीलंकेला विजयश्री मिळाली नाही.

बातम्या आणखी आहेत...