आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Indian Fans In Shock After South African Cricketer Ab De Villers Calls For Retirement From All Formats

इतकीही काय घाई होती! एबी डिव्हिलिअर्सच्या Retirement वर Fans च्या प्रतिक्रिया...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिकेचा तूफान फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने एक व्हिडिओ जारी करून संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ घोषणा होताच राजीनामा देत आहे असे त्याने सांगितले आहे. आपण आता थकलोय असे म्हणत त्याने निवृत्तीची घोषणा केली. 14 वर्षे क्रिकेटचा काळ गाजवणाऱ्या या बॅट्समनच्या निवृत्तीच्या घोषणेने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यावरून सोशल मीडियावर इतकी घाई का केली असा प्रश्न त्याला फॅन्स विचारत आहेत.


काय म्हणाला..?
व्हिडिओ मेसेजद्वारे संवाद साधताना अबराम बेंजामिन डिव्हिलिअर्स म्हणाला, "मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅट्समधून तत्काळ निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 114 टेस्ट सामने, 228 वनडे इंटरनॅशनल, 78 T20 इंटरनॅशनल खेळल्यानंतर निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या हिश्श्याचे खेळून झाले, प्रामाणिकपणाने मी निवृत्ती घेत आहे."


देशांतर्गत क्रिकेटमध्ये टायटन्ससाठी खेळणार 
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ए.बी. डिव्हिलर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक संन्यास घेण्याची घोषणा करत सर्वांना चकित केले. त्याने आपण ‘थकलो’ असल्याचे कारण दिले. तो आयपीएल 11 मध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाचा सदस्य होता. बंगळुरू संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर चार दिवसांनी 34 वर्षीय डिव्हिलर्सने एक व्हिडिओ संदेश जाहीर करत आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...