आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलमध्ये सततच्या पराभवांमुळे नाराज असलेल्या विराटच्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार क्रिकेटर विराट कोहलीला यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळू शकतो. भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी या वर्षी विराट कोहलीचे नाव सूचविले आहे. बीसीसीआयने या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला.
ध्यानचंद पुरस्कारासाठी गावस्करांचे नाव
भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांना ध्यानचंद पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. खेळाडूंना दिल्या जाणारा भारतातील हा सर्वात सन्मानाचा लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड आहे. तत्पूर्वी बुधवारी बीसीसीआयने स्मृती मंधाना आणि शिखर धवन यांच्याही नावांची अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे.
दुसऱ्यांदा झाला नॉमिनेट
विराट कोहलीचे नाव बीसीसीआयने राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2016 मध्ये सुद्धा बीसीसीआयने विराटच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती. पण, विराटला ते मिळू शकले नाही. यंदा विराटचे नाव मंजूर झाल्यास तो सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीनंतर तो सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळवणारा तो तिसरा क्रिकेटर ठरणार आहे. सचिन तेंडुलकरने 1997 मध्ये तर धोनीने 2007 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. दरवर्षी कुठल्याही स्पोर्ट्समध्ये उत्तुंग आणि अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.