आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केएल राहुलची IPL इतिहासातील सर्वात जलद फिफ्टी, मोडला दिग्गजांचा विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल-11 च्या रणधुमाळीत दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये मोहाली येथे दुसरा सामना खेळला गेला. यात पंजाबचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुलने इतिहास रचला. राहुलने फक्त 14 बॉलमध्ये 51 धावा काढून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान फिफ्टीचा विक्रम केला आहे. त्याने युसूफ पठाणचा विक्रम सुद्धा मोडला आहे. 2014 मध्ये पठाणने तो रेकॉर्ड नोंदवला होता. त्या निमित्त आम्ही आपल्याला आयपीएलच्या इतिहासातील 10 सर्वात वेगवान अर्धशतकांची यादी देत आहोत. 

 

अशी होती केएल राहुलची बॅटिंग...
- पंजाबने टॉस जिंकून प्रथम फील्डिंगचा निर्णय घेतला. आधी बॅटिंगवर उतरलेल्या दिल्लीच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 166 धावा काढल्या. यात कॅप्टन गौतम गंभीरने सर्वाधिक 55 धावा काढल्या. हे त्याचे 36 वे अर्धशतक होते. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी ओपनिंग केली. 
- केएल राहुलने पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलरची धुलाई सुरू केली. त्याने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा काढल्या. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरच्या फक्त 7 बॉल आणखी 35 धावा जोडल्या. त्यातही एक बॉल डॉट होता. यात राहुलच्या 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट चक्क 318.75 होता.
- मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबने 6 गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने दिलेले 167 धावांचे आव्हान पंजाबने 19 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, केएल राहुलनंतर सर्वात वेगवान आयपीएल फिफ्टीचे रेकॉर्ड्स...

बातम्या आणखी आहेत...