आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर फॉर्मात आला रोहित; फॅन्स म्हणाले, सेट होण्यासाठी घेतो 2-3 मॅच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुला 46 धावांनी पराभूत केले. या मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर बॅटिंगवर उतरलेल्या मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट देत 213 धावा काढल्या. कॅप्टन रोहित शर्माने 52 बॉलमध्ये 94 धावा काढल्या. त्यामध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. चालू टूर्नामेंटमध्ये यापूर्वीच्या 4 सामन्यात रोहितने एकूण फक्त 44 धावा काढल्या आहेत. तो परत फॉर्ममध्ये आल्याचे पाहता त्याचे चाहते प्रचंड खुश होते. काहींनी त्याला ट्रोल देखील केले. फॉर्मात येण्यासाठी ते 2-3 मॅच घेतो अशी प्रतिक्रिया एकाने दिली. 


मॅच समरी
मुंबई इंडियन्स - 213/6 (20 ओव्हर) (रोहित-94, लुईस- 65)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू- 167/8 (20 ओव्हर) (विराट- 92*)

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही प्रतिक्रिया

बातम्या आणखी आहेत...