आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2018 ची सेलिब्रिटी परफॉर्मन्ससह धडाकेबाज सुरुवात; वानखेडेवर दिमाखदार सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी 11 व्या सीझनची सुरुवात  अधिकृत घोषणेने केली. बॉलिवूड सिलेब्रिटीझच्या धमाकेदार परफॉर्मन्सने मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर ओपनिंग सेरेमनी पार पडली. यात सर्वप्रथम वरुण धवनने परफॉरमन्स दिली. त्याच्यासोबतच प्रभू देवा देखील थिरकला. यानंतर स्टेजवर अवतरली बाहुबलीची अॅक्ट्रेस तमन्ना भाटिया. तिने तामिळी गाण्यासह पिंगा या गाण्यावर परफॉर्म केले. याच परफॉर्मन्ससाठी सुरुवातीला रणवीर सिंहची निवड करण्यात आली होती. पण, त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने हृतिक रॉशनने परफॉर्म करण्यास पसंती दिली. 

 

आयपीएल ओपनिंग सेरेमनीत फक्त पहिल्या सामन्यातील दोन टीमचे कर्णधारच उपस्थित होते. मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा आणि चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एमएस धोनी व्यतिरिक्त एकही कॅप्टन मैदानात नव्हता. यासाठी आयपीएलने लॉजिस्टिक कारण दाखवले आहे. परफॉर्मन्स संपताच वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स भिडणार आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...