आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हैदराबाद - महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने रविवारी इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयाची नाेंद केली. चेन्नईने सामन्यात यजमान सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला. चेन्नईने चाैथ्या विजय मिळवला. विजयात दीपक चाहरनेही (३/१५) माेलाचे याेगदान दिले. हैदराबादला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
सामनावीर अंबाती रायडू (७९) अाणि सुरेश रैनाच्या (नाबाद ५४) अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने हैदराबादसमाेर खडतर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात चाहरच्या धारदार गाेलंदाजीमुळे हैदराबाद संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारता अाली. शार्दूल ठाकूर, कर्ण शर्मा व ब्राव्हाेने प्रत्येकी एक विकेट घेतली.
विलियम्सनचे सलग तिसरे अर्धशतक : हैदराबादच्या विलियम्सनने दिलेली एकाकी झुंुज व्यर्थ ठरली. त्याने ८४ धावांची खेळी केली. यासह त्याने लीगमध्ये सलग तिसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. अशी कामगिरी करणारा ताे सत्रात एकमेव खेळाडू ठरला. त्याने पंजाब (५४) अाणि काेलकाताविरुद्ध (५०) धावा काढल्या अाहेत.
सामनावीर अंबाती रायडूचे २७ चेंडूंत अर्धशतक
चेन्नईच्या सामनावीर अंबाती रायडूने तुफानी फटकेबाजी करताना २७ चेंडूंत अर्धशतक साजरे केले. त्याने ३७ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकार अाणि ४ षटकारांच्या अाधारे ७९ धावा काढल्या. यासह त्याने सत्रात अापल्या नावे पहिल्या अर्धशतकाची नाेंद केली.
पुढील स्लाईडवर पहा धावफलक.......
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.