आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Life Journey Of U19 World Cup Champion Team India Captain Prithavi Shaw, His Mumbai House Celebrations

U-19 कॅप्टन पृथ्वी शॉने मोडला विराटचा विक्रम, घरात असा झाला जल्लोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अंडर-19 वर्ल्ड कप 2018 च्या फायनलमध्ये शनिवारी टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. भारताने या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभूत केले. तसेच 4 वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनला आहे. या विजयाचे श्रेय कॅप्टन पृथ्वी शॉ आणि शतकवीर मनज्योत कालरा यांना दिले जात आहे. या विजयाचा जल्लोष अख्ख्या देशात साजरा केला जात आहे. तर मुंबईत पृथ्वी शॉच्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे. लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली. सगळेच ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या माळ लावून नाचत गात जल्लोष करत आहेत. 

 

शॉने मोडला कोहलीचा विक्रम...
- या विजयानंतर पृथ्वी शॉ अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा काढणारा भारतीय कर्णधार बनला आहे. 
- त्याने असे करून विराट कोहलीचा विक्रम देखील मोडला. पृथ्वी शॉने या टूर्नामेंटमध्ये 65.25 च्या सरासरी रनरेटसह 6 सामन्यांत 261 धावा काढल्या. त्याच्या सर्वाधिक 94 धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत्या.
- मालिकेच्या शेवटच्या सामन्यात तो जास्त टिकला नाही. तरीही यापूर्वीच्या तीन सामन्यांत त्याने 57 नाबाद, 40 धावा आणि 41 धावांची इनिंग खेळली आहे. फायनलध्ये तो 29 धावाच काढू शकला. 
- यापूर्वी विराट कोहली अंडर-19 क्रिकेट टीमचा कर्णधार असताना त्याने वर्ल्डकपमध्ये एकूण 235 धावा आणि उन्मुक्त चंदने 246 धावा काढल्या होत्या. पृथ्वीने त्या दोघांचा विक्रम मोडला.


सचिनशी होतेय तुलना...
- पृथ्वी शॉची तुलना मास्टर ब्लास्टर सचिनशी केली जात आहे. सचिनने डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये एकानंतर एक रेकॉर्ड करून वयाच्या 16 व्या वर्षी टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते. पृथ्वी सुद्धा त्याच वाटेवर आहे.
- पृथ्वीने जानेवारी 2017 मध्ये डॉमेस्टिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. केवळ वर्षभरातच आपल्या कर्तृत्वाने तो अंडर-19 चा कर्णधार बनला. त्याने 9 फर्स्ट क्लास सामन्यांत 5 शतक लावले आहेत. 
- सचिनने 18 वर्षांचा होण्यापूर्वी 7 सेन्चुरी लावल्या होत्या. पृथ्वीने 4 शतक लावले आहेत. हॅरिस शील्ड सामन्यात 546 धावा काढून तो चर्चेत आला होता. 

 

असे गेले पृथ्वीचे बालपण...
- पृथ्वी शॉचे बालपण मुंबईतच गेले आहे. त्याने आझाद मैदानावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आपली उंची स्टंप एवढी नव्हती, तेव्हापासून तो क्रिकेट खेळत आहे. त्याला क्रिकेटच्या तज्ञांनी रन मशीन नाव दिले. 
- मुंबईच्या आझाद मैदानावर एकाचवेळी 15-20 मॅच खेळले जातात. तरीही पृथ्वीची बॅटिंग पाहण्यासाठी दूर-दुरून लोक येतात. 
- पृथ्वी 3 वर्षांचा असताना त्याचे वडील पंकज शॉ यांनी पिंगुळकरांच्या क्रिकेट अकॅडमीत दाखल केले. सध्या तो रिझवी स्प्रिंगफील्ड स्कूलमधून 12 वी करत आहे.
- सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा पृथ्वीचा चांगला मित्र आहे. खुद्द सचिन तेंडुलकर पृथ्वीच्या फलंदाजीचा फॅन आहे. 


वडिलांनी निभावली आईची भूमिका...
- पृथ्वीचे वडील पंकज यांचा कपड्यांचा छोटासा व्यवसाय होता. पृथ्वी अवघ्या 4 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. 
- त्याने क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला तेव्हा त्याला दररोज पहाटे 4 वाजता उठून विरार ते वांद्रे पर्यंतचा प्रवास करावा लागत होता. इतक्या लहान वयात तो दररोज साडे तीन तास लोकलचा प्रवास करायचा.
- त्याला सकाळी झोपेतून उठवणे, तयार करणे आणि नाश्ता बनवण्यासह सर्वच काम त्याचे वडील करायचे. 
- यानंतर त्यांनी स्वतःचे बिझनेस बंद करून पृथ्वीच्या अकॅडमीजवळ दुकान घेतली. आणि तेथून बिझनेसला नव्याने सुरुवात केली. 

 

बटाटा वडा, चायनीझचा आहे शौकीन...
- लहानपणापासूनच त्याला बटाटा वडा खूप आवडतात. लहानपणी डब्यात तो हेच भजे घेऊन जायचा. कुणी मागितल्यास ते माझेच असल्याचे सांगून तो कुणालाही देत नव्हता. 
यासोबतच पृथ्वी चायनीझ फूडचा देखील शौकीन आहे. चांगल्या बॅटिंगनंतर तो चायनीझ फूड आणि सूपची डिमांड करतो. 

  

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याच्या घरात आणि घराबाहेरच्या जल्लोषाचे आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...