आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोने लावले Cheating चे आरोप, आता शमीने केला पलटवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाने मारहाण, दुसऱ्या महिलांसोबत संबंध आणि जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे गंभीर आरोप लावले आहेत. हसीन जहांने सांगितल्याप्रमाणे, शमीचे इतर अनेक महिलांसोबत अवैध संबंध आहेत. केवळ शमीच नव्हे, तर त्याचे कुटुंबीय देखील तिला मारहाण करतात. त्याच आरोपांवर शमीने आता उत्तर दिले आहे. 

 

माझ्यावरील सर्व आरोप खोटे
- बायकोने आरोप लावल्यानंतर शमीने प्रथमच आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे. आपल्यावर लावलेले सर्वच आरोप खोटे असून ती कटकारस्थान करत आहे असे शमीने म्हटले. 
- त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरच हे उत्तर जाहीर केले आहे. शमीने ट्वीट करताना लिहिले, 'हाय, मी मोहम्मद शमी आहे. माझ्या खासगी आयुष्यावर जेवढ्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या सर्व खोट्या आहेत. हा मला बदनाम करण्याचा आणि माझे क्रिकेट करिअर बिघडवण्याचा कटकारस्थान आहे.'
- शमीचा हा ट्वीट वाचल्यानंतर प्रथमदृष्ट्या तो त्यानेच लिहिला असे वाटत नाही. कारण, ट्वीटमध्ये हिंदी भाषा बंगालीने प्रभावित आहे. शमी मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्यामुळे, त्याची हिंदी चांगली आहे. बोलतानाही तो स्पष्ट हिंदी बोलतो.
- उल्लेखनीय बाब म्हणजे, शमी सध्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे आहे. तो आता देवधर ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट खेळत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, शमीचे ट्वीट आणि पत्नीने पोस्ट केलेले स्क्रीनशॉट...

बातम्या आणखी आहेत...