आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मोहम्मद शमीच्या घरी परतली हसीनजहा, मुलगी, पोलिसांसह वकिल सुद्धा पोहोचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीनजहाचे भांडण आता मिटल्याचे दिसून येत आहे. भारताचा स्टार बॉलर आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्लेअर मोहम्मद शमीच्या अमरोहा येथील घरी हसीन जहा आपल्या सामानासह रविवारी पोहोचली. ती आपल्या मुलीसह पोलिस आणि वकिलांना सुद्धा घेऊन आली आहे. पण, शमीच्या घरी लॉक असल्याने तिला आपले सामान शेजाऱ्यांच्या घरी ठेवावे लागले आहे.

 

यासाठी घेऊन गेली पोलिस 
हसीन जहाच्या शेजाऱ्यांनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे, शमीच्या घरी लॉक असल्याने त्याची पत्नी हसीन जहाने आपले सामान त्यांच्या घरात ठेवले आहे. सोबतच शमीच्या कुटुंबियांसह नवीन वाद होऊ नये यासाठी ती आपल्यासोबत पोलिस आणि वकिलांना घेऊन गेली होती. तिने शेजाऱ्यांशी बातचीत करताना आपला पती शमी आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल विचारणा देखील केली. 


असा सुरू झाला वाद...
> काही दिवसांपूर्वीच शमीची पत्नी हसीन जहाने शमीवर दुसऱ्या महिलांसोबत शारीरिक संबंध आणि डॉमेस्टिक वायलन्सचे आरोप लावले. आपल्या सोशल मीडियावर तिने शमीच्या कथित गर्लफ्रेंड्स आणि फॅन्ससोबतचे फोटो आणि चॅटिंग सुद्धा पोस्ट केली.
> वेळोवेळी तिने आपल्या आरोपांसह माध्यमांशी संवाद साधला आणि शमीवर एकानंतर एक गंभीर स्वरुपाचे आरोप लावले. शमी तिला आपल्या भावासोबत सुद्धा संबंध बनवण्यासाठी मजबूर करायचा असे आरोप तिने केले होते. सोबतच, भ्रष्टाचाराचे आरोपही लावले. पण, बीसीसीआयकडून त्याला क्लीनचिट मिळाली.
> यानंतर तिने आपल्या पती आणि सासरच्या मंडळींविरोधात भा.द.वी. कलम 498A, 323, 307, 376, 506, 328 आणि 34 नुसार कोलकाता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. 
> दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून खेळणाऱ्या शमीची 18 एप्रिल रोजी पोलिसांनी चौकशी सुद्धा केली होती. या दरम्यान शमीचा एक अपघात सुद्धा झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली. वेळोवेळी त्याने आपल्या पत्नीचे आरोप फेटाळून लावले. तसेच चर्चेसाठी आल्यास आपण तिला स्विकारणार असे तो म्हणाला होता. 

> ती आता राहायली आली की दुसऱ्या काही कारवाई निमित्त हे अद्याप स्पष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...