आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेल होती शमीची बायको हसीन जहां, सासऱ्यांनी लावली मॉडेलिंगवर बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पत्नी हसीन जहांच्या फेसबूक पोस्टने क्रिकेटर मोहम्मद शमीचे खासगी आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी कुटुंबियांचा होकार मिळवून लव्ह मॅरेज केले होते. माध्यमांना यांच्या लग्नाची बातमी स्वतः शमीच्या वडिलांनी दिली होती. शमीची पत्नी हसीन जहां एक स्ट्रगलिंग मॉडेल होती. तिच्याबद्दल आणखी काही माहिती आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. 

 

सासऱ्यांनी लावली मॉडेलिंगवर बंदी
- मोहम्मद शमी यांचे वडील तौसिफ अहमद यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची माहिती माध्यमांना दिली होती. 
- शमीने दोन वर्षांच्या अफेअरनंतर मॉडेल आणि मैत्रिण असलेल्या हसीन जहां हिच्याशी 6 जून 2014 रोजी विवाह केला होता. 
- शमीचे वडील एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते, "माझ्या मुलाचा विवाह एका खासगी समारंभात झाला आहे. निकाह 4 वाजता झाला आणि मित्रांसाठी संध्याकाळी 7 वाजता रिसेप्शन देण्यात आले. आम्ही इंडियन क्रिकेट टीमला निकाहसाठी निमंत्रणच दिले नाही. कारण, त्यांचा शेड्युल आम्हाला माहिती नव्हता."
- "माझी सून हसीन जहां एक मॉडेल होती. लग्नानंतर आता ती फुलटाइम हाऊसवाइफ होऊन राहणार आहे. आम्ही तिला मॉडेलिंगची परवानगी देऊ शकत नाही. तिने आमच्या मुलाला क्रिकेट करिअरमध्ये मदत करावी मॉडेलिंग नाही."
- शमीचे वडील मोहम्मद हसन कोलकाता येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होते. शमीची आई हाऊसवाइफ आहे. शमी आणि हसीनचा विवाह मुरादाबाद येथील हॉटेलात पार पडला होता. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...