आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs ENG T20: एमएस धोनीचा एक कॅच 25 लाखांचा, जाणू घ्या कसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - ब्रिस्टल येथे झालेल्या टी-20 च्या शेवटच्या आणि निर्णायक मॅचमध्ये भारताने इंग्लंडला 7 गडींनी पराभूत केले. तसेच तीन सामन्यांची ही सिरीझ 2-1 ने जिंकली आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारताने जिंकलेली ही सलग सहावी सिरीझ आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या यशाचे हिरो ठरले. यात रोहितने 56 बॉलमध्ये नाबाद 100 धावा काढल्या. त्यामध्ये 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. तर हार्दिकने आपल्या बॉलिंगने 4 गडी बाद केले. त्याने बॅटिंग करताना सुद्धा 11 बॉलमध्ये 33 धावा काढल्या. परंतु, या मॅचमध्ये धोनीने घेतलेला एक कॅच 25 लाखांत पडला आहे.


धोनीचा एक कॅच 25 लाखांचा
या मॅचमध्ये धोनीने एक कॅच घेतला. परंतु, या एका कॅचने टीमला 25 लाखांचा भुर्दंड बसला आहे. इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना 14 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या बॉलिंग करत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर इयॉन मॉर्गनने हवेत शॉट खेळला. तो कॅच पकडण्याच्या नादात धोनीने चुकून एलईडी स्टंप तोडला. त्याची किंमत तब्बल 40,000 अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 25 लाख रुपये होती. धोनीचा हा कॅच अतिशय महत्वाचा होता. त्याने तो झेल घेतला नसता तर भारताला विजय मिळवणे कठिण झाले असते. 


धोनीने बनवले दोन विक्रम
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार विकेटकीपर धोनीने इंग्लंडविरुद्ध खेळताना तिसऱ्या सामन्यात दोन विक्रम केले आहेत. त्याने एकाच टी-20 मॅचमध्ये 5 झेल घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. आतापर्यंत जगातील कुठल्याही विकेटकीपरने आंतरराष्ट्रीय टी-20 च्या एका सामन्यात इतके कॅच घेतलेले नाहीत. सोबतच, टी-20 इंटरनॅशनलमध्ये तब्बल 50 कॅच घेणारा तो जगातील एकमेव विकेटकीपर बनला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने घेतलेल्या झेलची संख्या 54 झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...