आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनची जागा घेणे तर सोडाच, त्याची जर्सी सुद्धा कुणीच घालू शकत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - जगभरात मास्टर ब्लास्टर नावाने प्रसिद्ध असलेला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर 24 एप्रिल रोजी आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या इतिहासात सचिन हे नाव इतके महान आहे की त्याची जागा तर सोडाच, त्याची जर्सी सुद्धा कुणीच घालू शकत नाही. 10 नंबरची जर्सी म्हटले, की लोकांच्या डोळ्यांसमोर सचिनचे चित्र उभे राहते. अशात दुसऱ्यांनी ती जर्सी घातल्यास काय होईल याचा अनुभव शार्दुल ठाकूरला आला आहे. श्रीलंका विरोधात डेब्यू करताना त्याने 10 नंबरची जर्सी घातली होती. मॅचमध्ये ती जर्सी पाहून सचिनचे चाहते प्रचंड संतापले. त्यांचा संताप पाहून बीसीसीआयला 10 नंबरची जर्सी सुद्धा रिटायर करावी लागली आहे. 


> गतवर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जर्सी नंबर-10 ला निवृत्त देण्याची घोषणा करताना एका अधिकाऱ्याने सांगितले, विनाकारण या नंबरमुळे क्रिकेटर्स वादात अडकत होते. त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत होते. 

> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हा नंबर रिटायर केला जात असला तरीही लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यावर बंदी लावली जाणार नाही. 

> बीसीसीआयने हा निर्णय घेण्यापूर्वी काही क्रिकेटर्सचा सल्ला देखील घेतला होता. सचिनने 24 वर्षे याच नंबरची जर्सी घातली होती. त्यामुळे, त्यांनीही सचिनची ओळख बनलेल्या या जर्सीला निवृत्ती देण्याचे समर्थन केले आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, जेव्हा शार्दुलने घातली सचिनची जर्सी असे संतापले फॅन्स...

बातम्या आणखी आहेत...