आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये मुंबईने पंजाबला नमवले, आनंदात नीता अंबांनींनी मुलाला दिली घट्ट मिठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 50 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबला 3 धावांनी पराभूत केले आहे. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या सामन्याच्या सुरुवातीला टॉस हारलेला मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबई इंडियन्स पूर्ण ओव्हर खेळत गडी गमावून 186 धावा काढल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेला पंजाबचा संघ फक्त 183 धावाच काढू शकला. ही मॅच मुंबईसाठी करा किंवा मरा अशी होती. मॅच हारल्यास मुंबईला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले असते. अशात मुंबई इंडियन्सने अतिशय महत्वाचा विजय मिळवला. त्यामुळेच, मॅच जिंकताच खेळाडूंसह टीमच्या ओनर नीता अंबानी सुद्धा एक्साइट झाल्या. त्यांनी आनंदात आपला मुलगा आकाश अंबानीला मिठी दिली. यानंतर त्यांनी पंजाबची को-ओनर प्रीतीची सुद्धा भेट घेतली. 

 

आव्हान कायम
या विजयासह मुंबईच्या संघाला 13 सामन्यात 12 अंक मिळाले आहेत. पंजाबला पराभूत केले तरीही मुंबई समोरचे आव्हान अजुनही संपलेले नाही. मुंबई इंडियन्सला 20 मे रोजी होणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धचा सामना सुद्धा जिंकावाच लागणार आहे. त्यावरून मुंबई पुढे जाणार किंवा नाही याचा निर्णय होईल. तरीही पॉइंट्स टेबलची गंमत अशी की केकेआरचा पराभव झाल्यास मुंबई पुन्हा सावरू शकतो.
 

मॅच समरी
मुंबई इंडियन्स- 186/8 (20 ओव्हर) (कीरोण- 50, कृणाल- 32, टाय- 4/16)
किंग्स XI पंजाब- 183/5 (20 ओव्हर) (राहुल- 94, फिन्च- 46, बुमराह- 3/15)
MoM- जसप्रीत बुमराह


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...