आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना वाचवण्याठी किडनी द्यायला तयार होता हा क्रिकेटर; प्रथमच आयपीएलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्सचा खेळाडू कॅगिसो रबाडा 11 व्या सीझनमध्ये जखमी आहे. त्याच्या जागी टीमने लियाम प्लंकेटला समाविष्ट केले आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर प्लंकेटने आपल्या देशासाठी आतापर्यंत 13 टेस्ट, 85 वनडे आणि 15 टी-20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. तसेच प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार आहे. 


2012 मध्येच घेणार होता संन्यास
इंग्लंडच्या या खेळाडूने 2012 मध्ये खासगी आयुष्यात सुरू असलेल्या गोंधळांमुळे संन्यासही घेण्याचे ठरवले होते. लियामच्या वडिलांना किडनीचा आजार झाला होता. तसेच ट्रान्सप्लांटसाठी किडनी उपलब्ध होत नव्हती. अशात त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेट सोडून आपली एक किडनी वडिलांना देऊ अशी त्याची तयारी होती. सुदैवाने लियामच्या वडिलांना किडनी डोनर मिळाला. तसेच लियमचे क्रिकेट करिअर देखील वाचले. 


उल्लेखनीय बाब म्हणजे, दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर रबाडाला दिल्लीच्या संघाने लिलावात 4.2 कोटी रुपयांत विकत घेतले होते. पण, दुखापतीमुळे तो 3 महिने मैदानावर येऊ शकत नाही. त्याच्याच जागी आता दिल्ली डेयरडेव्हिल्स संघात प्लंकेट खेळत आहे. 2005 मध्ये टेस्ट आणि वनडे डेब्यू करणाऱ्या प्लंकेटची आयपीएलमध्ये ही पहिलीच संधी आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, प्लंकेटच्या पर्सनल लाइफचे काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...