आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र, राज्य सरकारमध्ये अडकली भारताची स्टार क्रिकेटर; ठोठावला 27 लाखांचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाची युवराज सिंह या नावाने ओळखल्या जाणारी फलंदाज हरमनप्रीत कौर पंजाब सरकार आणि केंद्र सरकारमध्ये अडकून पडली आहे. पंजाबच्या कॅप्टन सरकारने तिला पोलिस उप-महाधीक्षक बनवले. पण, रेल्वे विभाग तिला सोडण्यास तयार नाही. रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, तिला 27 लाख रुपयांचा दंड भरल्याशिवाय नोकरी सोडता येणार नाही. त्याशिवाय तिचा राजीनामा मंजूर होणारच नाही. हरमन आणि रेल्वे विभागात 5 वर्षांचा करार झाला होता. त्यामुळे, रेल्वेने हा दंड ठोठावला आहे. 


- गेल्या 3.5 वर्षांपासून हरमन रेल्वे कार्यरत होती. गतवर्षी वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज परफॉर्मंसनंतर पंजाब सरकारने तिला डीएसपी करणार असल्याची घोषणा केली. 
- कॅप्टन सरकारने रेल्वे विभागाला पत्र पाठवून हरमनला करारातून मुक्त करण्याची विनंती केली. जेणेकरून तिला डीएसपी पदी कार्यरत करता येईल. सोबत नियुक्तीचे पत्र देखील काढले.
- डीएसपी पदी तिला एका महिन्यात जॉइन होण्यास सांगण्यात आले. मात्र, रेल्वे विभागाने तिचा राजीनामा मंजूर केला नाही. यानंतर पंजाब सरकारने जॉइनिंगची मुदत वाढवली. त्यातच आता रेल्वे विभागाने हरमन विरोधात दंड भरण्यासाठी नोटीस काढली आहे. 
- हरमनचे वडील हरमिंदर सिंग आता आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी रेल्वे विभागाकडे याचना करत आहेत. वारंवार विनंती करुनही रेल्वेकडून काही प्रतिक्रिया येत नसल्याची तक्रार त्यांनी केली. 

 

कोण आहे हरमन कौर
- हरमनप्रीत कौरला हॅरी सुद्धा म्हटले जाते. हरमनने 2009 आयसीसी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात डेब्यु केले होते. 
- हरमनप्रीतने पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून फिरोजपूर टीमसाठी ऑलराउंडर क्रिकेटरच्या रुपात सुरुवात केली होती. 
- हरमनने आतापर्यंत 73 वनडे आणि 68 टी-20 मॅच खेळले आहेत. तिचे वडील एका वकिलाकडे हिशोबनीस म्हणून काम करतात.


पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टार वुमन क्रिकेटर हरमनचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...